Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी वेशांतर करुन बच्चू कडूंचा बँक व्यवस्थापकाला लाच देण्याचा प्रयत्न, पुढे काय झाले...

वेशांतर करुन बच्चू कडूंचा बँक व्यवस्थापकाला लाच देण्याचा प्रयत्न, पुढे काय झाले वाचाच

बच्चू कडू यांनी एका दुकानात जाऊन गुटखा खरेदी करण्याचा प्रयत्न केला

Related Story

- Advertisement -

राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे नेहमीच आपल्या वेगळ्या कार्यशैलीमुळे चर्चेत असतात. जनमानसातला नेता म्हणूनही बच्चू कडूंची ओळख आहे. बच्चू कडू यांनी वेशांतर करुन अकोला जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, बँका आणि विविध शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या आहेत. यामध्ये बच्चू कडू यांनी स्वस्त धान्य दुकान म्हणजेच रेशनच्या दुकानांनाही भेटी देऊन झाडाझडती घेतली आहे. तसेच गुटखा विक्रेत्याकडून गुटखा खरेदी करत त्याच्यावर कारवाईचा बडगाही उगारला आहे. बच्चू कडू यांनी नेहमीचा पेहराव न करता वेशांतर आणि आपली देहबोलीही बदलली होती. बच्चू कडू बँकेत कर्ज घेण्यासाठी गेल्यावर त्यांनी बँक व्यवस्थापकांना लाच देण्याचा प्रयत्न केला आहे.

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज शासकीय काम आणि भेटीगाठीचे कार्यक्रम जाहीर न करत छुपा पाहणी दौरा केल्याचे उघड झाले आहे. बच्चू कडू यांनी युसुफाखाँ हे पठाण नाव धारण करुन साजेशा पेहरावही केला होता. या पेहरावात बच्चू कडूंना ओळखणं कठीणच दिसत आहे. या वेशात बच्चू कडूंनी जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. नेहमीच्या सुरक्षा बंदोबस्ताशिवाय बच्चू कडूंनी दौरा केला आहे. तसेच शासकीय कार्यालयांचीही झाडाझडती घेतली आहे. कर्ज घेण्यासाठी बच्चू कडू थेट बँकेत पोहचले आणि बँक व्यवस्थापकांना लाच देण्याचा प्रयत्न केला परंतु बँक व्यवस्थापकांनी रितसर अर्ज करण्याचा सल्ला बच्चू कडू यांना दिला आहे.

महानगरपालिकेत खळबळ

- Advertisement -

बच्चू कडू वेशांतर करुन महानगरपालिकेत दाखल झाले. परंतु त्यावेळी मनपा आयुक्त निमा आरोरा त्याच्या दालनात नव्हत्या यामुळे त्यांनी त्यांच्या स्विय सहायकांची भेट घेतली. बच्चू कडूंनी महानगरपालिकेच्या सर्व विभागांची पाहणीही यावेळी केली. परंतु बच्चू कडू महानगरपालिकेतून निघून गेल्यानंतर पालकमंत्री वेशांतर करुन आले असल्याची चर्चा सुरु झाली आणि संपुर्ण महानगरापालिकेत खळबळ माजली होती.

स्वस्त अन्नधान्य दुकानात ताफा

बँकेतून बच्चू कडू पातूर तहसील कार्यालयात पोहचले त्याठिकाणी तातडीने रेशन कार्ड बनवण्याबाबत चौकशी केली यावर त्यांना रितसर अर्ज भरण्यास सांगितले गेले. यानंतर बच्चू कडूंनी अन्नधान्य दुकानांची पाहणी केली. याठिकाणीही बच्चू कडू याना प्रामाणिपणाच पाहायला मिळाली आहे. ऑनलाईन धान्य वितरण करण्यात येत असल्यामुळे धान्य देता येणार नसल्याचे कारण त्यांना मिळाले. यानंतर त्यांनी कृषी सेवा केंद्रांची आढावा घेतला याठिकाणीही त्यांना चोख व्यवस्थेचं दर्शन झालं आहे.

गुटखा जप्त

- Advertisement -

बच्चू कडू यांनी एका दुकानात जाऊन गुटखा खरेदी करण्याचा प्रयत्नही केला. या किराणा दुकानावर बच्चू कडू यांनी धाड टाकली आणि त्या दुकानगारावर कारवाई केली आहे. गुटखा विक्रेत्यांकडूनच औषध अन्न औषध प्रशासन आणि पोलिसांना हप्ते पुरवे जात आहे अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. हप्ते खात असल्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याचे मतही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -