घरमहाराष्ट्रशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी - बच्चू कडू

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी – बच्चू कडू

Subscribe

सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी विनंती आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे भरपूर नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्यासह अपक्ष आमदार मंजुळा गावीत आणि राजकुमार पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी सरकारकडू शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २० ते २५ हजार मदत मिळावी आणि याशिवाय कर्जमाफी मिळावी, असा मुद्दा मांडला. उद्धव ठाकरे यांनी सर्व मुद्दे समजून घेतले आणि त्यामुळे आता निश्चितच शेतकऱ्यांना दिलासादायक काम होणार असल्याचे बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

नेमके काय म्हणाले बच्चू कडू?

‘खरंतर आज आपण महाराष्ट्रात चौफेर बघितले तर शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. यामध्ये शिवसेनेची भूमिका महत्त्वाची आहे. शिवसेनेची भूमिका शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. त्यामुळेच आज मी उद्धव ठाकरे यांना भेटलो. या भेटीदरम्यान शेतकऱ्यांना सरकारने सरसकट २० ते २५ हजार हेक्टरी मदत करुन ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. कर्जमाफीच्या विषयावर तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. हातातील पीक गेले आणि डोक्यावर कर्ज राहिले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. याच संदर्भात आमची बैठक संपन्न झाली. उद्धव साहेबांनी बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या आहेत. त्यामुळे निश्चित शेतकऱ्यांना भविष्यात फायदा होईल. सरकारने सरसकट कर्जमाफी देणे गरजेचे आहे’, असे बच्चू कडू म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -