बच्चू कडूंचा पुन्हा एकदा शिंदे-सरकारला घरचा आहेर, म्हणाले, “मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर…”

राज्यात सध्या विधानपरिषद निवडणूकीच्या निकालामुळे राजकीय वातावरणं चांगलंच तापलंय. त्यातच मंत्रिमंडळ विस्ताराला होणाऱ्या विलंबामुळे शिंदे गटातील आमदार व माजी मंत्री बच्चू कडूंची नाराजी वेळोवेळी दिसून आली. आता तर बच्चू कडूंचा धीर सुटत चालला असून यंदा त्यांनी शिंदे-सरकारला घरचा आहेरच दिलाय.

Bachchu-Kadu-On-Maharashtra-Cabinet
नुकत्याच हाती आलेल्या विधानपरिषद निवडणुकीतील निकालावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की....

राज्यात सध्या विधानपरिषद निवडणूकीच्या निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत. राज्यातलं राजकीय वातावरणं चांगलंच तापलं असल्याचं दिसून येतंय. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तारावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचं पहायला मिळतंय. मंत्रिमंडळ विस्ताराला होणाऱ्या विलंबामुळे शिंदे गटातील आमदार व माजी मंत्री बच्चू कडूंची नाराजी वेळोवेळी दिसून आली. आता तर बच्चू कडूंचा धीर सुटत चालला असून यंदा त्यांनी शिंदे-सरकारला घरचा आहेरच दिलाय.

आमदार बच्चू कडूंनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मोठं विधानं केलं आहे. विधानपरिषदेच्या निकालाचा विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, पण मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर याचा फटका शिंदे-फडणवीस सरकारला बसू शकतो, असं भाकित बच्चू कडूंनी दिलंय. बच्चू कडू पंढरपुरात आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने राज्यातली सगळीच कामं खोळंबली आहेत. जर राज्यातली कामंच झाली तर जनता लोकप्रतिनिधींवर नाराज होऊन त्याचा परिणाम येत्या लोकसभा निवडणूकीच्या निकालात दिसू शकतो. याचा फटका शिंदे-फडणवीस सरकारला बसू शकतो, असा इशाराही त्यांनी दिलाय. राज्यात एका मंत्र्याकडे एकापेक्षा जास्त खाती आहेत. अनेक जिल्ह्यांना एकच पालकमंत्री असल्याने लोकांची कामं होत नाहीत. अशावेळी तातडीने मंत्रिमंडळ विस्तार झाला तर लोकांचे प्रश्न लवकरात लवकर सुटतील. अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते, असं देखील कडू म्हणाले.

नुकत्याच हाती आलेल्या विधानपरिषद निवडणुकीतील निकालावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, जुन्या पेन्शनचा मुद्दा प्रलंबित असल्याने असे निकाल लागले. या निवडणूकीतील मतदार संघटित असल्याने त्यांचा निकाल आणि ताकद दाखवू शकले. मात्र याही पटीने जास्त असणाऱ्या असंघटित शेतकरी, शेतमजूर , कामगार वर्गाचे प्रश्न यापेक्षा गंभीर आहेत. त्याकडे जर लक्ष दिले नाही तर त्याचा परिणाम शिंदे-सरकारवर होऊ शकतो असं देखील कडू यांनी सांगितले.