मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रस्त्यांची चाळण; वाहनचालक, प्रवासी संतप्त

मुंबई – मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील तलासरी ते घोडबंदर या दरम्यान महामार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले असून मागील दोन महिन्यांपासून नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Bad situation of Mumbai-Ahmedabad highway; Drivers, passengers angry)

हेही वाचा घरावर झेंडा लावताना छतावरून पडून वृद्ध इसमाचा मृत्यू

या भागातील बोईसर विधानसभा आमदार राजेश पाटील यांनी वारंवार टोलवसुली करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधून खड्डे बुजवून प्रवाशांना व वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी लेखी व प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. मागणीनंत महामार्गावरील देखभाल करणाऱ्या कंपनीने खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक व डांबर मिश्रित खडी टाकण्याचे काम सुरू केले होते. मात्र पहिल्याच दिवसात येथे पुन्हा मोठा खड्डा निर्माण झाला. तसेच, नवीन खड्ड्यांची भर दिवसागणिक पडतच असल्याने महामार्गाची चाळण झाली आहे.

हेही वाचा बोईसर ग्रामपंचायतीचं नगरपालिकेत रूपांतर करण्यासाठी नागरिकांची मागणी

देशात महत्वाच्या सुवर्ण चतुष्टकोनचा हिस्सा असलेल्या या महामार्गाची स्थिती आता बिकट झाली असून खड्ड्यांमुळे रोज अपघात घडत आहेत. यामध्ये अनेक निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागत आहे. तर, अनेकजण जायबंदी झाले आहेत. तर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे एक तर खड्डेमुक्त महामार्ग करा अन्यथा टोलवसुली बंद करा अशा घोषणा देऊन बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली १३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून टोल वसुली बंद पाडली.

यावेळी पंचायत सदस्य अशोक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या कल्याणी तरे, माजी उपसभापती कविता किरकिरा, ज्येष्ठ कार्यकर्ते सदानंद पाटील, किशोर कीणी, अशोक पाटील, माजी उपसरपंच प्रणय कासार, ॲड नितीन भोईर, नितीन साने, नाना पाटील, बबन नामकुडा, दिगंबर पाटील, विशाल पाटील, संदीप पाटील, कल्पेश पाटील, नितीन तरे, नामदेव घरत, वैभव जाधव, यांच्यासह बविआचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.