घरठाणेविवियाना मॉल राडाप्रकरणात जितेंद्र आव्हाडांसह 12 जणांना जामीन मंजूर

विवियाना मॉल राडाप्रकरणात जितेंद्र आव्हाडांसह 12 जणांना जामीन मंजूर

Subscribe

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये 'हर हर महादेव' चित्रपटाचा शो बंद पाडत, प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी अटक केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी आव्हाडांना ठाणे न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी याप्रकरणी सुनावण्यात झाली.

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाडांसह इतर 12 जणांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाणे न्यायलयाने जितेंद्र आव्हाड आणि इतर 12 जणांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. (Bail granted to 12 people including ncp mla Jitendra Awhad)

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडत, प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी आव्हाडांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले होते. न्यालयातील सुनावणीनंतर आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

- Advertisement -

या सुनावणीनंतर न्यायालयाने 1 तास निकाल राखून ठेवला होता. तासाभराने न्यायालयाने निकाल दिला असून, जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ठाणे न्यायालयाच्या या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर दुपारी 3 वाजता सुनावणी आव्हाडांच्या जामीन अर्जावर झाली. त्यानंतर आव्हाडांना जामीन मंजूर करण्यात आला.

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या जामीनावर न्यायालयात सुनावणी झाली. जितेंद्र आव्हाडांच्या वतीने अॅड. प्रशांत कदम यांनी त्यांच्या अटकेवर युक्तिवाद केला. तसेच, आव्हाड आणि इतर लोकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असल्याचा युक्तिवाद अॅड कदम यांनी केला आहे. दाखल करण्यात आलेले गुन्हे जाणीवपूर्वक करण्यात आले असून कलम 7 हा वाढवू शकत नाही. कारण तशी तरतूद 1932 साली करण्यात आली आहे, जी महाराष्ट्रात लागू होत नसल्याचे त्यांनी म्हंटले.

- Advertisement -

या प्रकरणी आव्हाडांसह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. आव्हाडांवर कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – आव्हाडांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली – मुख्यमंत्री शिंदे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -