Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम हिना पांचाळसह २५ जणांना जामीन मंजूर

हिना पांचाळसह २५ जणांना जामीन मंजूर

इगतपुरी रेव्ह पार्टीप्रकरण

Related Story

- Advertisement -

इगतपुरी रेव्ह पार्टीप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (दि.१९) बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री हिना पांचाळसह 25 संशयिताना जामीन मंजूर केला. पियुष सेठियासह हर्ष शैलेश शहा यांच्याकडे कोकेन मिळून आल्याने न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला.

इगतपुरीतील स्काय ताज व्हीला व ताज व्हीलामध्ये अंमली पदार्थ्यांच्या सेवनासह हवाईयन रेव्ह पार्टी चालू असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी बिग बॉस फेम हिना पांचाळसह २९ संशयितांना अटक केली. ड्रग्ज विक्रीप्रकरणी पोलिसांनी मुंबईतून नायझेरियन गुन्हेगार पीटर उमाही यास अटक केली. पोलिसांनी ७ जुलै रोजी हिना पांचाळसह सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी तपासणीसाठी पाठवलेल्या पाण्याच्या नमुन्यामध्ये कोकेन असल्याचा समोर आले आहे. रेव्ह पार्टी करताना आणि अमली पदार्थांचा पुरवठा करणार्‍या हिना पांचाळसह संशयितांनी जामीन अर्जासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. या अर्जांवर युक्तिवाद पूर्ण झाल्याने सोमवारी न्यायालयाने हिना पांचाळसह २५ संशयितांना जामीन मंजूर केला.

- Advertisement -