घरमहाराष्ट्रसोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात वॉरंट

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात वॉरंट

Subscribe

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात सोलापूर न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आले आहे.

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात सोलापूर न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन बैठकीच्या वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करताना धक्काबुक्की केल्याप्रकरणी कोर्टात तारखेला हजर न राहिल्याने आमदार प्रणिती शिंदे तसेच नगरसेवक चेतन नरोटे यांच्याविरूध्द न्यायाधिशांनी जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. दरम्यान, कोर्टात हजर झालेल्या माजी आमदार प्रकाश यलगुलवारसह ७ जणांना दोन दिवस अंतरीम जामीन वाढवून दिला आहे.

काय आहे प्रकरण

२ जानेवारी २०१८ रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं. औषधोपचारावर झालेली दरवाढ रद्द करा, अशी मुख्य मागणी आंदोलकांची होती. कार्यकर्ते पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत पोलीस कर्मचारी खाली पडून जखमी झाला होता. यानंतर पोलिसांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासहित इतरांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास करत चार्जशीटही दाखल केली होती.

- Advertisement -

प्रणिती शिंदे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

जिल्हा नियोजन बैठकीदरम्यान पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करताना झालेल्या धक्काबुक्कीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. सुनावणीदरम्यान प्रणिती शिंदे गैरहजर राहिल्याने जामिनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. प्रणिती शिंदे यांच्यासहित महापालिका गटनेते चेतन नरोटे यांना ३ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयात हजर झालेल्यांना न्यायालयाने दोन दिवसांसाठी अंतरिम जामीन वाढवून दिला आहे. यामध्ये माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासहित साज जणांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -