राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया कधी होणार? बाळा नांदगावकर म्हणाले…

राज ठाकरे या सर्वांना आवर्जून काही क्षणांसाठी तरी नक्की भेटतात. परंतु उद्या होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे यावेळी ही भेट होणार नसली तरी याने राज ठाकरेंचा सर्वांप्रति असलेला जिव्हाळा कमी होणार नाही.

Bala Nandgaonkar said Raj Thackeray undergo surgery on Wednesday
राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया कधी होणार? बाळा नांदगावकर म्हणाले उद्या...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान राज ठाकरेंची भेट झाली नसल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीसुद्धा राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरेंना शुभेच्छा देताना नांदगावकरांनीसुद्धा भेटता न आल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. परंतु राज ठाकरेंच्या पायावर कधी शस्त्रक्रिया होणार याबाबत माहिती दिली आहे. उद्या राज ठाकरेंच्या पायाच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी काही वैद्यकीय चाचणी अहवाल काढण्यात आले. गेल्या वेळी चाचणी अहवालात राज ठाकरेंच्या शरीरामध्ये कोविड डेड सेल्स आढळले होते. यामुळे शस्त्रक्रिया रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा बुधवारी राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ५४ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज राज ठाकरेंचा वाढदिवस, या दिवसाची वाट साहेबांचे सर्वच चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक वर्षभर पाहत असतात. राज्यातून तसेच देशातील अनेक ठिकाणांहून हजारो जण या दिवशी राज ठाकरेंची प्रत्यक्ष भेट घेतात. राज ठाकरे या सर्वांना आवर्जून काही क्षणांसाठी तरी नक्की भेटतात. परंतु उद्या होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे यावेळी ही भेट होणार नसली तरी याने राज ठाकरेंचा सर्वांप्रति असलेला जिव्हाळा कमी होणार नाही. हे वर्ष व इथून पुढील अनेक वर्षे राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आपल्या मनसेला सुवर्णकाळ येणार हे निश्चित. आज जरी राज ठाकरेंची भेट होणार नसली तरी लवकरच हा दुरावा मिटेल व आपणा सर्वांना राज ठाकरे भेटतील.

कोविड डेड सेल्स आढळल्याने शस्त्रक्रिया रद्द

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. राज ठाकरेंची रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. चाचणी अहवालात राज ठाकरेंच्या शरीरामध्ये कोविड डेड सेल्स आढळले आहेत. यामुळे त्यांना शस्त्रक्रियेपूर्वी भूल देता येणार नाही. असेही डॉक्टरांनी सांगितले. वैद्यकीय कारणास्तव राज ठाकरेंच्या पायावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. आता पुन्हा राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल होतील. तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल. दरम्यान बाळा नांदगावकर यांच्या ट्विटनुसार राज ठाकरे यांच्या उद्या म्हणजेच बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे समजते आहे.


हेही वाचा : काहींचा समाजात तेढ पसरवण्याचा प्रयत्न; कारवाईबाबत पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा – गृहमंत्री