मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क मधील बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळी जात पुष्पांजली अर्पण केली. 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे प्रदीर्घ आजाराने ‘मातोश्री’ येथे निधन झाले. (balasaheb thackeray 12th death anniversary rahul gandhi post my thoughts are with uddhav thackeray)
शिवसेना संस्थापक बाळ ठाकरे यांची आज 12 वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र उद्धव ठाकरे यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, कॉंग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि शिवसेना नेता आदित्य ठाकरे यांनी देखील शिवाजी पार्कवर जात बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
हेही वाचा – Eknath Shinde : मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मी…, निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे काय म्हणाले
विशेष म्हणजे, कॉंग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या 12 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. उद्धव ठाकरे, आदित्य आणि शिवसेनेच्या संपूर्ण परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी राहुल गांधी यांनी अशी पोस्ट करणे हे फार महत्त्वाचे आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींना यासंदर्भात आव्हान दिले होते. राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांनी म्हटले होते की, मविआच्या घटक पक्षांना माझे आव्हान आहे की, त्यांनी युवराजांकडून बाळासाहेब ठाकरे यांची तारीफ करून दाखवावी. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची ही पोस्ट महत्त्वाची मानली जात आहे.
Remembering Balasaheb Thackeray ji on his 12th death anniversary. My thoughts are with Uddhav Thackeray ji, Aditya and the entire Shiv Sena family.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 17, 2024
अमित शहा यांनी देखील राहुल गांधी यांना आव्हान दिले होते. मात्र, या दोघांच्या टीकेला उत्तर म्हणून कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, आमची विचारधारा जरी वेगळी असली तरी आम्ही शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान सहन करू शकत नाही. आणि कॉंग्रेसचा कोणताही नेता किंवा राहुल गांधी देखील हे सहन करणार नाहीत. राहुल गांधी यांच्या या पोस्टवर आता भाजपाकडून टीका केली जाणार का, हे पाहणंही महत्त्वाचं आहे. (balasaheb thackeray 12th death anniversary rahul gandhi post my thoughts are with uddhav thackeray)
हेही वाचा – Mayawati : …म्हणून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय; पुण्यात मायावतींनी सांगितलं कारण
Edited by : Ashwini A. Bhatavdekar