घरट्रेंडिंगभाजपाला टार्गेट करत, नेटकऱ्यांनी बाळासाहेबांच्या नावावरून शिंदे गटाला केले ट्रोल

भाजपाला टार्गेट करत, नेटकऱ्यांनी बाळासाहेबांच्या नावावरून शिंदे गटाला केले ट्रोल

Subscribe

केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी नवीन नाव आणि चिन्ह दिले. त्यानंतर राज्यात नव्या संघर्षाला सुरू झाले. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' आणि शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव दिले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी नवीन नाव आणि चिन्ह दिले. त्यानंतर राज्यात नव्या संघर्षाला सुरू झाले. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव दिले. मात्र, शिंदे गटाला दिलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या नावावरून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला नेटकरी सोशल मीडियावर ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामागचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आणखी तीन जणांना ‘बाळासाहेब’ म्हणून ओळखले जातात. (Balasaheb thackeray balasaheb thorat prakash ambedker bjp balasaheb devras cm eknath shinde)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत नेते बाळासाहेब देवरस, कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (बाळासाहेब) आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, असे राज्यातील एकूण चार नेत्यांना बाळासाहेब या नावाने ओळखले जाते. त्यामुळे नेटकऱ्यांनी प्रकाश आंबेडकर आणि बाळासाहेब थोरात यांचा फोटो आणि त्याला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे लिहून ट्रोल केले जात आहे.

- Advertisement -

याशिवाय, शिंदे गटाला यापुढील काळात बाळासाहेबांची शिवसेना गट म्हणून ओळखले जाणार आहे. मात्र, ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत नेते बाळासाहेब देवरस यांची असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शिंदे गटाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक दिवंगत बाळासाहेब देवरस यांचे नाव मिळाले, भाजपने डाव साधला, असे या संदेशात म्हटले आहे.

ठाकरे गटाच्या वतीने ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ असे पक्षनावांचे तीन पर्याय आयोगापुढे सादर करण्यात आले होते. मात्र, ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ हा पक्षनावाचा पर्याय शिंदे गटानेही दिला होता. दोन्ही गटांकडून एकाच नावाचा आग्रह धरला गेल्याने हे पक्षनाव कोणत्याही गटाला न देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आणि ठाकरे गटाच्या दुसऱ्या पर्यायाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे ठाकरे गट आता ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ या नावाने ओळखला जाईल.

- Advertisement -

हेही वाचा – सरन्यायाधीश उदय लळित यांचे उत्तराधिकारी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड! केंद्राकडे शिफारस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -