घरताज्या घडामोडी'गद्दारांच्या हस्ते तैलचित्रांचे अनावरण होतंय, माझे आजोबाही विचार करतील' - आदित्य ठाकरे

‘गद्दारांच्या हस्ते तैलचित्रांचे अनावरण होतंय, माझे आजोबाही विचार करतील’ – आदित्य ठाकरे

Subscribe

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असून त्या निमित्ताने विधान भवनात त्यांच्या तैलचित्राचे आज अनावरण करण्यात येणार आहे. मात्र, या तैलचित्राच्या अनावरणावरून ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर निशाणा साधला आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असून त्या निमित्ताने विधान भवनात त्यांच्या तैलचित्राचे आज अनावरण करण्यात येणार आहे. मात्र, या तैलचित्राच्या अनावरणावरून ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर निशाणा साधला आहे. “बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण एका घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. माझे आजोबाही विचार करतील की, गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचे अनावरण होत आहे”, असा खोचक टोला आदित्य यांनी लगावला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील रांजणगाव येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उदघाटन झालं यावेळी ते बोलत होते. (balasaheb thackeray birth anniversary aaditya thackeray slams cm eknath shinde)

“राज्य ओके नाही पण हे ओके होऊन बसले आहेत. जेवढे ते खालच्या पातळीवर जातील तेवढे आपण मोठ्या उंचीवर जाणार आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रांचं अनावरण विधिमंडळात केले जाणार आहे. मात्र या गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचं अनावरण झाले असे माझे आजोबा म्हणतील. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझ्या आजोबांच्या तैलचित्रांचे अनावरण होणार आहे. एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षेमुळे राज्य मागे गेले आहे. ” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

- Advertisement -

“तुम्ही असं काय खाल्लं होतं जे अपचन झाल्यानंतर पचन होण्यासाठी एवढ्या दूर जावे लागले. तर ही टोळी उद्योगात घुसल्यानंतर आपलं काही खरं नाही, म्हणून उद्योग राज्याबाहेर जात आहेत. राज्यात बोगस कंपन्या आणल्या असून, याबाबत पत्रकार परिषद घेऊन यांचा भांडाफोड करणार आहे”, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं आज विधिमंडळात अनावरण होणार आहे. मात्र त्यापूर्वीच या सोहळ्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर येणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -