Live Update : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देशविरोधी शक्तींना दहशत बसवणारं एक नेतृत्व – अंबादास दानवे

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देशविरोधी शक्तींना दहशत बसवणारं एक नेतृत्व – अंबादास दानवे

देशाच्या राजकारणाला हिंदुत्वाची दिशा देणारं व्यक्तिमत्व – अंबादास दानवे


उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहात दाखल


बाळासाहेब ठाकरेंच्या विधानभवानातील तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमास सुरुवात

निहार ठाकरे, स्मिता ठाकरेही कार्यक्रमास हजर

कलाकार महेश मांजरेकर, प्रसाद ओक, नवाजउद्दीन सिद्दिकीसह अनेक अभिनेते, अभिनेत्री कार्यक्रमास उपस्थित

बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच अनावरण, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवारांची हजेरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, अजित पवार, गुलाबराव पाटील,जयंत पाटील, नीलम गोऱ्हे आणि आंबादास दानवे हजर

खासदार गजानन किर्तीकरही उपस्थित

देशविदेशातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला लावली हजेरी


बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच्या अनावरणासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानभवनात दाखल


रिगल चौकातील शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून अभिवादन, सोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरेही उपस्थित


अॅण्टिलिया प्रकरणी प्रदीप शर्मा यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला


डॉ. योगेश म्हसे यांची रायगडच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती

राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची कोश्यारींची इच्छा, पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यादरम्यान केली विनंती 


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, CBI ची याचिका फेटाळली


शर्लिन चौप्राच्या आरोपांनंतर आंबोली पोलीस ठाण्यात राखी सावंत विरोधात गुन्हा दाखल


दादरमधील आंबेडकर भवनात उद्धव ठाकरे दाखल


अंनिसच्या श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी

तुमचा दाभोलकर करू, अशी धमकी


माजी मंत्री अनिल देशमुख पीएमएलए कोर्टात हजर

मनी लॉड्रींग प्रकरणी ६ फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी


गिरगावच्या कतार लेनमध्ये निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळला; ८ वर्षीय मुलाचा मृत्यू


पाकिस्तानमध्ये मोठा प्रमाणात वीजपुरवठा खंडित

इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीच्या महत्त्वपूर्ण भागांमध्ये वीज नाही


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे आज अनावरण

सायंकाळी 6 वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात तैलचित्राचे अनावरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही कार्यक्रमाचं आमंत्रण


वंचित आघाडी आणि शिवसेनेच्या युतीची आज घोषणा; दुपारी होणार पत्रकार परिषद

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार

दुपारी 12.30 वाजता होणार पत्रकार परिषद

पत्रकार परिषदेत शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीची होणार घोषणा