Homeमहाराष्ट्रBalasaheb Thackeray : ते तर भारतीय संस्कृतीचे पाईक, जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींचे बाळासाहेबांना...

Balasaheb Thackeray : ते तर भारतीय संस्कृतीचे पाईक, जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींचे बाळासाहेबांना अभिवादन

Subscribe

शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांची आज (23 जानेवारी) जयंती असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. बाळासाहेब ठाकरे हे संस्कृतीचे पाईक होते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले आहे.

Balasaheb Thackeray Birth Anniversary : मुंबई : शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांची आज (23 जानेवारी) जयंती असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. बाळासाहेब ठाकरे हे संस्कृतीचे पाईक होते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्मरण केले आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. मोदी म्हणतात, “बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या जयंतीनिमित्त मी आदरांजली वाहतो. (balasaheb thackeray birth anniversary pm narendra modi ncp sp chief sharad pawar pays tribute to shiv sena founder)

बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या लोककल्याणाच्या कार्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी जे योगदान दिले आहे, त्यासाठी नेहमीच ओळखले जातील. त्यांची मूल्य, निष्ठा यांच्याशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. भारतीय संस्कृतीचा मान वाढावा यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केल्याचे पंतप्रधान यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ट्वीट करत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. प्रभावी व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध व्यंगचित्रांच्या माध्यमातून ‘मार्मिक’ भाष्य केले. कुशल संघटक, मुत्सद्दी राजकारणी असलेल्या बाळासाहेबांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी लढा दिल्याचे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसांच्या स्वाभिमान जागृतीसाठी कायम ते प्रयत्नशील राहिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – SS UBT Vs BJP : भाजपच्या शहा – फडणवीसी राजकारण्यांनी महाराष्ट्र गलितगात्र केला, ठाकरे संतापले

मुंबईसह राज्यभरात आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभरातील शिवसैनिक, राजकीय नेते बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करत आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा अंधेरी येथील शहाजे राजे क्रीडा संकुलात तर शिवसेना शिंदे गटाचा मेळावा मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात होणार आहे.

हेही वाचा – Chitra Wagh Vs Aaditya Thackeray : अपात्र बहिणींची संख्या वाढणार? चित्रा वाघांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर