Balasaheb Thackeray Death Anniversary: मराठी माणूस स्वाभिमानाने जगतोय तो बाळासाहेबांमुळे, संजय राऊतांचे वक्तव्य

Balasaheb Thackeray Death Anniversary sanjay raut said marathi people live free due to balasaheb
Balasaheb Thackeray Death Anniversary: मराठी माणूस स्वाभिमानाने जगतोय तो बाळासाहेबांमुळे, संजय राऊतांचे वक्तव्य

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मराठी माणूस स्वाभिमानाने जगतोय. मराठी माणसाने बाणा ताठ ठेवावा, मुंबई मराठी लोकांची आहे, असं संजय राऊत म्हणाले. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती सुधारत असून लवकरच घरी परततील अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. बाळासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानाने लढण्याची प्रेरणा दिली. मराठी माणूस स्वाभिमानाने जगतोय तो बाळासाहेबांमुळे मराठी माणसाने बाणा ताठ ठेवावा, मुंबई मराठी लोकांची आहे, असं संजय राऊत म्हणाले. बाळासाहेबांचं स्मरण आम्हाला रोज होत असतं. महाराष्ट्राला होतं तसंच देशाला देखील होतं. जेव्हा जेव्हा संकट डोकावतं तेव्हा बाळासाहेब हवे होते असा विचार मनात येतो, असं राऊत म्हणाले.

सेना-भाजप युतीचा मध्यस्थी करणारे विक्रम गोखले कोण?

अभिनेते विक्रम गोखले यांनी शिवसेना-भाजप युतीसाठी मध्यस्थी करायला तयार आहे, असं म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना-भाजप युती करण्यासाठी ते मध्यस्थी करणारे कोण? असा सवाल करत विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला. ज्यांनी क्रांतिकारकांचा अपमान केलाय, अशा व्यक्तींची माध्यस्थीसाठी गरज नाही, अशी रोखठोक भूमिका संजय राऊत यांनी स्पष्ट केली.

हेच मुख्यमंत्र्यांचं यश

महाविकास आघाडीमधील सर्वच मंत्र्यांना मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत म्हणाले. यावर भाष्य करताना जोरदार पलटवार केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून प्रत्येक नागरिकाला, मंत्र्याला मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं यश आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ते कबुल केलं, असं राऊत म्हणाले.


हेही वाचा : “काय तरी द्या वाल्यांची वेदना मी समजू शकतो”, संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार