Balasaheb Thackeray Death Anniversary: तेजस ठाकरेंनी बाळासाहेबांना केलं अभिवादन

Balasaheb Thackeray Death Anniversary Tejas Thackeray pay tribute to Balasaheb at shivtirth

शिवसेनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नववा स्मृतीदिन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिस्त्रक्रियेनंतर उपाचारार्थ रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी ठाकरे कुटुंबीयांतील सदस्य उपस्थित राहणार नाही अशी चर्चा होती. मात्र बाळासाहेबांचे नातु आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी शक्तीस्थळी हजेरी लावत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काळजी घेण्यासाठी पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे बायोबबलमध्ये असल्यामुळे उपस्थित राहणार नाहीत अशा चर्चा होत्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल आहेत. मुख्यमंत्र्यांवर पोस्ट सर्जरी उपचार सुरु आहेत. आरोग्याच्या दृष्टीने त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले असून त्यांची काळजी घेण्यासाठी पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर देखील असतात या तिघांनाही बायोबबलमध्ये ठेवण्यात आले आहे. यामुळे तेजस ठाकरे शक्तीस्थळी हजर राहणार की नाही अशी चर्चा होती. मात्र तेजस ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे उभी राहून बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. आदित्य ठाकरे हे परदेशात असल्यामुळे ते शक्तीस्थळी उपस्थित राहू शकले नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एच एन रिलायन्स फाऊन्डेशन रुग्णालयात उपचार घेत आहेत. पोस्ट सर्जरी उपचार मुख्यमंत्र्यावर करण्यात येत आहेत. पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी ठाकरे परिवार बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी पोहचू शकले नाहीत. दरवर्षी ठाकरे कुटुंबीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी येत असतात. परंतु यंदा ठाकरे कुटुंबीय एकत्र येऊ शकले नाही. कुटुंबीयांपैकी कोणच स्मृतीस्थळी हजर राहणार नसल्याची चर्चा होती मात्र तेजस ठाकरे यांनी स्मृतीस्थळी अभिवादन केलं. ते १० मिनिट स्मृतीस्थळी उपस्थित होते त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर देखील होते.


हेही वाचा : मराठी माणूस स्वाभिमानाने जगतोय तो बाळासाहेबांमुळे, संजय राऊतांचे वक्तव्य