घरमहाराष्ट्रबाळासाहेब हा एक विचार, ती कुठल्याही पक्षाची मालमत्ता नाही, मनसेचं उद्धव ठाकरेंना...

बाळासाहेब हा एक विचार, ती कुठल्याही पक्षाची मालमत्ता नाही, मनसेचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Subscribe

स्वतःच्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते, आता दास झाल्याचा टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना लगावलाय. त्याच मुद्द्यावरून आता मनसेनं शिवसेनेवर हल्लाबोल केलाय

मुंबई: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हा एक विचार आहे आणि विचार हा कुठल्या पक्षाची किंव्हा व्यक्तीची खासगी मालमत्ता असू शकत नाही, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणालेत. संदीप देशपांडेंनी ट्विट करत शिवसेनेचा जोरदार समाचार घेतला आहे. जेव्हा महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक करायचं होतं तेव्हा बाळासाहेब पूर्ण हिंदुस्थानचे होते. आता म्हणता फक्त तुमचेच असं कसं????, सवालही मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली होती. त्या बैठकीत त्यांनी उद्धव ठाकरेंनी शिंदेंबरोबर गेलेल्या बंडखोरांना चांगलेच फटकारले होते. विशेष म्हणजे बंडखोरांना त्यांनी स्वतःच्या बापाचं नाव लावून मतं मागण्याचा सल्ला दिलाय. स्वतःच्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते, आता दास झाल्याचा टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना लगावलाय. त्याच मुद्द्यावरून आता मनसेनं शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.

- Advertisement -


दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंचं नाव वापरू नका, या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विधानावरूनही वाद ओढवण्याची शक्यता आहे. कारण बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष आहेत. त्यामुळे राष्ट्रपुरुषांचे नाव सामान्य जनता आणि इतर नागरिकांना वापरण्याचा अधिकार असतो. बाळासाहेब ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रासह मुंबईत आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून आता शिवसेनेत बाळासाहेब गट आणि दुसरा (उद्धव) गट असे दोन गट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत यातून अधिकाधिक शिवसैनिक आपल्या गटाशी भावनिकरीत्या जोडले जातील, असा एकनाथ शिंदे गटाचा अंदाज आहे.

- Advertisement -

हेही वाचाः …तर स्वतःच्या बापाच्या नावानं मतं मागा, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -