बाळासाहेब ठाकरेंच्या सख्ख्या बहिणीचे निधन, वयाच्या ८४ वर्षी घेतला अखेरचा श्वास

Balasaheb Thackeray's sister Sanjeevani Karandikar passed away at the age of 84
बाळासाहेब ठाकरेंच्या सख्ख्या बहिणीचे निधन, वयाच्या ८४ वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सख्खी बहिण संजीवनी करंदीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या त्या कन्या आहेत. संजीवनी करंदीकर पुण्यात स्थायिक होत्या. ८४ वर्षाच्या संजीवनी करंदीकर यांची सकाळी प्राणज्योत मालवली आहे. यामुळे ठाकरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संजीवनी करंदीकर या आत्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या सख्य्या बहिणीचे निधन झाले आहे. आजारी असल्यामुळे त्यांना सायंकाळी दीनानाथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु वय जास्त असल्यामुळे उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना संजीवनी करंदीकर यांच्या मृत्यूची माहिती कळाली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी करंदीकर कुटुंबीयांच्या फोनवरुन सांत्वन केलं आहे. दरम्यान त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी ५ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. मुख्यमंत्री उद्ध ठाकरे पुण्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी उपस्थिती लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कनिष्ठ भगिनी व राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आत्या संजीवनी करंदीकर यांचे आज वयाच्या ८४ वर्षी पुणे येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले सर्व शिवसेना परिवार आपल्या दुःखात सहभागी आहे. परमेश्वर संजीवनी करंदीकर यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती प्रदान करो ही प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. अशा आशयाची पोस्ट शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केली आहे.


हेही वाचा : पुणे रेल्वे स्थानकावर आढळली बॉम्बसदृश्य वस्तू, वस्तू स्फोटक…