Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी शिवसेना भाजपसोबत जाणार नाही, मविआ सरकार ५ वर्ष टिकणार असल्याचा बाळासाहेब थोरात...

शिवसेना भाजपसोबत जाणार नाही, मविआ सरकार ५ वर्ष टिकणार असल्याचा बाळासाहेब थोरात यांचा दावा

कोरोनाच्या कामाबाबत जगामध्ये कौतुक झालं आहे. सरकार म्हणून कोणताही धोका आम्हाला नाही.

Related Story

- Advertisement -

राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कलह होत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यामुळे आता काँग्रेस नंतर शिवसेनेकडूनही स्वबळाचा नारा दिला जात असल्याची शक्यता आहे. तर मोदी-ठाकरे भेट आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे मोठी खळबळ माजली आहे. या पत्रात शिवसेनेनं भाजपशी जुळवून घ्यावं अशी विनंती सरनाईक यांनी केली आहे. परंतु शिवसेना भाजपसोबत जाणार नाही आणि हे सरकार ५ वर्ष टिकणार असल्याचा दावा काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. तसेच प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक होत असलेल्या त्रासामुळे पत्र लिहिले असावे असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.

काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राज्य सरकारमध्ये सगळं काही अलबेलं सुरु आहे. भाजप केवळ खोटेपणा करत असून यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा सूर थोरात यांच्या वक्तव्यातून समोर येत आहे. तीन पक्षाचं सरकार आहे. मागील दीड वर्षात सरकारनं चांगलं काम केलं आहे. कोरोनाच्या कामाबाबत जगामध्ये कौतुक झालं आहे. सरकार म्हणून कोणताही धोका आम्हाला नाही. महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे चांगलं काम करणार आहे. भाजपला त्रास होतोय तो व्यक्तिगत त्रास आहे. परंतु मागील ५ वर्षांमध्ये भाजपनं जी वागणूक शिवसेनेला दिली. हेच कारण महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यासाठी पुरेसं असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

भाजपसोबत शिवसेना जाणार नाही

- Advertisement -

तसेच बाळासाहेब थोरात यांनी पुढे म्हटलं आहे की, भाजपसोबत जाण्याची कोणतीही मानसिकता शिवसेनेमध्ये नाही. नेतृत्वाचीही मानसिकता नाही आहे. आमदार प्रताप सरनाईक यांना व्यक्तिगत जो त्रास होत आहे. यामुळे त्यांनी पत्र लिहून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती केली आहे. भाजपकडून त्रास दिला जात आहे. भाजप-शिवसेना युतीमध्ये शिवसेनेला दुजाभाव आणि छळ झाला असल्याच मत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीही व्यक्त केलं होते.

भाजपशी जुळवून घ्या – सरनाईक

राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे.ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्‍त करतो असे आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.

- Advertisement -

सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे.

- Advertisement -