घरमहाराष्ट्रलसीकरणाबाबत केंद्राकडे योग्य धोरण आणि नियोजन नाही; बाळासाहेब थोरातांची टीका

लसीकरणाबाबत केंद्राकडे योग्य धोरण आणि नियोजन नाही; बाळासाहेब थोरातांची टीका

Subscribe

कोरोनाच्या लाटेला आपण सर्वजण सामोरे जात आहोत परिणाम खूप गंभीर आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. यावरच एकच उपाय आहे तो म्हणजे लसीकरण करणं. परंतु, केंद्रातील मोदी सरकारकडे लसीकरणाबाबत योग्य धोरण आणि नियोजन नाही, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. तसंच, निवडणुका आणि कुंभमेळा यामुळे कोरोनाचा विस्फोट झाला, असं देखील थोरात म्हणाले. बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

कोरोनाच्या लाटेला आपण सर्वजण सामोरे जात आहोत परिणाम खूप गंभीर आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. यावरच एकच उपाय आहे तो म्हणजे लसीकरण करणं. परंतु या लसीकरणाच्या बाबतीमध्ये जे काही धोरण थरवलं जात आहे ते केंद्र सरकार ठरवत आहे. दुर्दैवाने केंद्र सरकारजवळ कोणतंही धोरण नाही आणि कोणतंही नियोजन नाही. हे सिद्ध होत आहे, असं थोरात म्हणाले.

- Advertisement -

पहिली लाट होऊन गेली मग निवडणूक आणि कुंभमेळा झाले यामध्ये परिस्थिती गंभीर झाली. याला सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारची आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्स निर्माण केली मग केंद्र सरकार काय करत आहे? असा सवाल देखील थोरात यांनी केला. आपल्या देशातील लसी परदेशात पाठवलं आणि आम्ही कसं जगाचं नेतृत्तव करतो असं दाखवणं महागात पडलं आहे.

४५ वर्षावरील लसीकरणाची जबाबदारी केंद्राची आहे. तीही पार पाडताना दिसत नाही आहे. जबाबदारी घेतली तरी पुरेसा साठा नाही, पहिला डोस झालाय दुसरा कधी असा प्रश्न विचारला जात आहे.१८ वर्षावरील लसीकरण राज्याला करायचं आहे. त्यामध्ये राज्याला २.५० लाख लसी आल्या आहेत. यामध्ये कसं लसीकरण केलं जाणार? लसीकरण करायला कोव्हीन अॅप सांगितला आहे. त्या अॅपमध्येही गोंधळ आहे, असं थोरात म्हणाले.

- Advertisement -

एका लसीचा डोस घेण्यासाठी लोक किती धावपळ करत आहेत याचं उदाहरण म्हणजे माझ्या मतदार संघात नाशिकमधून, पुण्यावरून, हैद्राबादवरून आणि परभणी वरून लोक आले आहेत. यावरून समजतं की लसीकरणाचे नियोजन केंद्राकडून कसं केलं जात आहे. मी कॅबिनेट मध्ये विषय मांडला होता की आम्हाला स्वतंत्र अॅप बनवायला परवानगी द्या. आम्ही नियोजन करतो पण अजून याबद्दल काहीही उत्तर केंद्राने दिलेलं नाही, असं थोरात यांनी सांगितलं. कोव्हीन अॅपच्या गोंधळामुळे लोक गर्दी करत आहेत तिथून कोरोनाचा फैलाव होण्याची भीती देखील थोरात यांनी व्यक्त केली.

कोरोना हाताळण्यासंदर्भात सर्वांचं कौतुक

सगळीकडे कोरोना हाताळण्यात आपलं कौतुक केलं जात आहे. आपल्या सर्व गोष्टींमध्ये पारदर्शकता आहे. जगामध्ये मुंबई मॉडेलचं कौतुक केलं जात आहे. मुंबईचं मॉडेल तयार झालेलं आहे, त्याप्रमाणे गावात देखील कोरोना थांबावा यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं थोरात म्हणाले. यावेळी त्यांनी लॉकडाऊन बाबतीतचा निर्णय कॅबिनेटमध्ये होईल याबाबत चर्चा होईल, असं सांगितलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -