नाना पटोले यांच्या पाठोपाठ बाळासाहेब थोरातांनी घेतली फडणवीसांची भेट

Balasaheb Thorat meet devendra fadnavis

काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत खासदार राजीव सातव यांची पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. प्रज्ञा सातव बिनविरोध निवडून याव्यात यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठोपाठ काँग्रेस नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली.

देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. एखादी दु:खद घटना घडली तर त्या पक्षाचा उमेदवार बिनविरोध निवडून दिला जातो, अशी महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. यासंदर्भात फडणवीस आणि पाटील यांच्याशी चर्चा केली. आम्ही वरिष्ठांशी चर्चा करु, असं त्यांनी आम्हाला सांगितलं.

बाळासाहेब यांना नाना पटोले यांनी भेट घेतली असताना पुन्हा एकदा काँग्रेस नेत्याने का भेट घेतली असं विचारलं असता, नाना पटोले यांचं विमान होतं. तसंच त्यांच्या घरी शुभकार्य आहे. त्याचं निमंत्रण देण्यासाठी ते फडणवीसांच्या भेटीला आले होते. त्यावेळी त्यांना तुम्हीही विनंती करा असं सांगितल्याचं थोरात म्हणाले.

नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्या विनंतीनंतर भाजप काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल. या पोटनिवडणुकीसाठी अर्ज माघारीची मुदत २२ नोव्हेंबर २०२१ अशी आहे.


हेही वाचा – नाना पटोलेंनी घेतली फडणवीसांची भेट; विधान परिषदेची निवडणूक होणार बिनविरोध?