Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : सभागृहात थोरातांची कमी सर्वांना जाणवेल; पराभवावर सत्यजीत तांबेंची प्रतिक्रिया

Maharashtra Politics : सभागृहात थोरातांची कमी सर्वांना जाणवेल; पराभवावर सत्यजीत तांबेंची प्रतिक्रिया

Subscribe

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यात बाळासाहेब थोरात यांच्या नावाचाही समावेश आहे. याप्रकरणी त्यांचे भाचे आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. 230 जागा घेत महायुतीच्या वादळाने महाविकास आघाडीला भुईसपाट केलं आहे. महाविकास आघाडीला फक्त 46 जागा जिंकता आल्या. धक्कादायक म्हणजे काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यात बाळासाहेब थोरात यांच्या नावाचाही समावेश आहे. याप्रकरणी त्यांचे भाचे आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Balasaheb Thorat nephew Satyajit Tambe first reaction to his defeat)

सत्यजीत तांबे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, अजित पवार यांनी माझ्याशी विशेष करून बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर चर्चा केली. बाळासाहेब थोरात यांचा पराभवा कशामुळे झाला? असा थेट प्रश्नच त्यांनी मला विचारला. यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर दु:खही व्यक्त केले. तसेच बाळासाहेब थोरात यांच्यासारखा सीनियर माणूस हा पराभूत व्हायला नको होता. शेवटी त्यांच्या अनुभवाचा सभागृहामध्ये होणारा वापर हा सर्व वरिष्ठ नेत्यांना गरजेचा होता, असेही अजित पवार यांनी म्हटल्याचे तांबे यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : 11 जिल्ह्यात मविआचा सुपडा साफ, तर 20 ठिकाणी काँग्रेस हद्दपार

सत्यजीत तांबे म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांची सभागृहातली कमी निश्चितच सर्व नेत्यांना जाणवल्याशिवाय राहणार नाही. खरं तर संगमनेरचा निकाल हा धक्कादायक आहे. कारण 40 वर्ष बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केलं आहे. असे असतानाही ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं आहे, ते त्यांनी का केलं असेल? असा मला प्रश्न पडतो आहे. पण आता संगमनेर विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे आम्ही निश्चित आत्मपरीक्षण करू, असे वक्तव्य सत्यजीत तांबे यांनी केले.

- Advertisement -

अमोल खताळ जायंट किलर

दरम्यान, बाळासाहेब थोरात गेल्या 40 वर्षांपासून संगमनेरचे आमदार होते. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना स्वीकारावा लागला. संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून अमोल खटाळ यांना तिकीट दिले होते. मात्र अमोल खटाळ यांनी बाळासाहेब थोरातांचा पराभव केला आहे. त्यामुळे त्यांची ओळख जायंट किलर अशी होताना दिसत आहे.

हेही वाचा – Politics : उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान दिलं तर…; काय म्हणाले बावनकुळे?


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -