Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पवारांनी टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे, बाळासाहेब थोरातांचे आवाहन

पवारांनी टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे, बाळासाहेब थोरातांचे आवाहन

धार्मिक भेदी वाढल्याने काँग्रेसची दुरावस्था झाली आहे.

Related Story

- Advertisement -

काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील जमीनदारासारखी झाली असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवारांच्या वक्तव्याशी असहमत असल्याचे काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी काँग्रेसवर टीका करण्याने काही नुकसान होणार नाही. समविचारी असलेल्या लोकांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आल्यास काँग्रेसला चांगले दिवस येतील आणि देशाची लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई एकत्र लढावी असे आवाहनच बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे. शरद पवारांच्या वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांनी पलटवार करत आवाहन केलं आहे. राष्ट्रवादीकडून थोरातांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. थोरात यांनी म्हटलं आहे की, काँग्रेसची अवस्था जमीनदारी गेलेल्या जमीनदारासारखी झाली आहे. असे शरद पवार यांनी म्हटले असून त्यांच्या विधानाशी मी असहमत आहे. पवारांच्या वक्तव्याचा काँग्रेसवर काही परिणाम होणार नाही. विरोधकांनी त्यांच्या वक्तव्यावर राजकीय फायद्यासाठी टीका केली तरी काँग्रेसचे त्याच्यामुळे नुकसान होणार नाही. त्यांनी टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या विचाराचे जे लोकं आहेत त्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे आणि लोकशाही व राज्यघटना टिकवण्यासाठी सोबत लढाव असे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी करत राष्ट्रवादीला आवाहन केलं आहे.

धार्मिक भेदी वाढल्याने काँग्रेसची दुरावस्था

- Advertisement -

देशात धार्मिक भेदाभेद करणारे लोकं अधिक झाल्यामुळे काँग्रेसच्या विचाराला कठीण दिवस आले आहेत. काँग्रेस हा एक विचार आहे. आपण सर्व एका विचाराचे आहोत त्यामुळे पुन्हा एकत्र सर्व आले तर काँग्रेसला यापुढे चांगले दिवस येतील असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

ओबीसी आरक्षणासाठी विरोधक सोबत

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी विरोधकांना सोबत घेतलं आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. त्या निर्णयावर चर्चा करुन कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसारच सर्व मिळून चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

यंत्रणांचा राजकीय वापर

- Advertisement -

केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या जसं बोलतात तशी ईडी कारवाई करते यामुळे भाजपच्या इशाऱ्यावर ईडी चालते असा नागरिकांचा समज झाला आहे. यामुळे केंद्रीय यंत्रणांचा राजकीय फायद्यासाठी वापर करण्यात येत असल्याचे जनता जाणून असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : भाजपची राजकीय खेळी, ६ महिन्यांत ४ मुख्यमंत्र्यांचा पायउतार


 

- Advertisement -