घरताज्या घडामोडीकाँग्रेसची शिर्डीमध्ये नवसंकल्प कार्यशाळा, राज्यातील राजकीय व सामाजिक प्रश्नांवर होणार मंथन

काँग्रेसची शिर्डीमध्ये नवसंकल्प कार्यशाळा, राज्यातील राजकीय व सामाजिक प्रश्नांवर होणार मंथन

Subscribe

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरुन नेते नाराज आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आशिष देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

राज्यातील सामाजिक आणि प्रश्नांवर दोन दिवस काँग्रेसचे मंथन असणार आहे. प्रदेश काँग्रेसकडून दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा घेण्यात येत आहे. १ व २ जून रोजी होत असलेल्या या कार्यशाळेत उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या घोषणापत्राची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील रोडमॅप तयार केला जाणार असल्याची माहिती, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नवसंकल्प कार्यशाळाबाबत माहिती दिली आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे दोन दिवसाचे नवसंकल्प शिबीर नुकतेच उदयपूर येथे पार पडले. या शिबिरातील घोषणापत्राची अंमलबजावणी राज्यात केली जाणार आहे. यासाठी राजकीय, संघटन, आर्थिक, शेती, शेतकरी आणि सहकार, सामाजिक न्याय आणि युवा व महिला सक्षमीकरण या विषयावर साधक-बाधक चर्चा करण्यासाठी सहा गट स्थापन करण्यात आले आहेत. हे सहा गट घोषणापत्राच्या अमंलबजावणीसंदर्भात रोडमॅप तयार करतील आणि त्यावर समूह चर्चा होईल तर दुसऱ्या दिवशी या सहा गटांच्या अहवालांचे सादरीकण केले जाईल. उदयपूरच्या नवसंकल्प शिबिरातील सर्व मुद्दे राज्यातील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

- Advertisement -

काँग्रेसमध्ये नाराजी

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरुन नेते नाराज आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आशिष देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इम्रान प्रतापगढी उत्तर प्रदेशचे मुस्लिम उमेदवार आहेत. प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. नग्मा मोरारजी यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना डावलण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


हेही वाचा : यूपीच्या नेत्याला महाराष्ट्रातून राज्यसभेचे तिकीट दिल्यानं आशिष देशमुखांचा राजीनामा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -