राज्याला अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या रुपाने चांगले नेतृत्व लाभले – बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरे यांनी राजीनाम दिल्यानंतर महाविकास आघाडीमधील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपले मत व्यक्त केले.

यावेळी उद्धव ठाकरे हे संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. आक्रमक न होता कोणाला न दुखवता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे हे संयमी नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते. यावर देखील थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते चव्हाण यांचे वैयक्तीक मत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोरोना काळातील काम कौतुकास्पद –

राज्याला अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांच्या रुपाने चांगले नेतृत्व लाभले होते. कोरोना काळात परिस्थिती बिकट होती. संपूर्ण देश हातबल झाला होता. मात्र, या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंत्रणा सक्षमपणे राबवत राज्याला संकटातून बाहेर काढल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामंतरनावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी संभाजीनगरच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. याला कोणाचाही विरोध नाही. हा विषय धार्मिक नाही. तर स्वराज्याशी संबंधित आहे. त्यामुळे आमचा त्याला विरोध नसल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. पक्षातील आमदारांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे देखील थोरात यांनी यावेळी सांगितले.