घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोनाच्या लढ्यात केंद्राकडून राज्य सरकारला मदत मिळेना

CoronaVirus: कोरोनाच्या लढ्यात केंद्राकडून राज्य सरकारला मदत मिळेना

Subscribe

केंद्राकडे वारंवार मागणी करूनही राज्य सरकारला मदत मिळेना, अशी बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यासह देशात कोरोनाचे संकट असताना आता राज्याला चिंता आहे बिघडलेला आर्थिकघडीची. लॉकडाऊनमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर परिणाम झाला असून, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचे याची चिंता सरकारपुढे आहे. त्यातच केंद्र सरकार देखील हक्काचे थकीत पैसे राज्याला देत नसल्याने आता आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमच्या हक्काचे १६ हजार कोटी रुपये थकीत आहेत. सध्या राज्यात कोरोना लढ्यासाठी या पैशांची गरज आहे. त्यामुळे वारंवार केंद्राकडे या पैशांची मागणी केली जात आहे. मात्र, पैसे मिळत नसल्याची टीका केंद्र सरकारवर केली आहे.

आमच्या केंद्राकडून निश्चित काही अपेक्षा 

कोरोनाच्या या संकटात राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सर्व मंत्री आणि सर्वच सरकारी यंत्रणा राबत आहे, प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच काही प्रमाणात आपल्याला यश मिळाले हे नाकारता येणार नाही. यामध्ये सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे राज्य सरकार काम करत असताना केंद्राकडून असणाऱ्या काही अपेक्षा. आमच्या केंद्राकडून निश्चित काही अपेक्षा आहेत. यात राजकारण करायच नाही, पण या अपेक्षा आहेतच. केंद्र सरकारकडे महाराष्ट्राच्या हक्काचा जो वाटा आहे. तो १६ हजार ६५६ कोटी रुपये इतका आहे. तो आम्हाला तातडीने मिळणे आवश्यक असल्याचे थोरात म्हणालेत.

पीपीई किटच्या बाबतीत प्रचंड अपूर्तता 

दरम्यान जीएसटीच्या वाट्या व्यतिरिक्त कोरोनाशी लढण्यासाठी आणखी निधी मिळणे आवश्यक आहे. पीपीई किट केंद्र सरकार पुरवणार असा निर्णय झाला आहे. केंद्र सरकारनेच तसे कळवले आहे. मात्र, पीपीई किटच्या बाबतीत प्रचंड अपूर्तता दिसते आहे. जे रुग्ण आता तपासले जात आहेत किंवा ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्यासाठी पीपीई किट आहेत. परंतु नवीन जे रुग्ण येत आहेत, त्यांच्या तपासणीसाठी आणि उपचारासाठी संबंधित डॉक्टरांना देखील पीपीई किट देणे आवश्यक आहे. याबाबतीत देखील अपूर्तता दिसत आहे. ती पूर्ण केली पाहिजे, असे देखील बाळासाहेब थोरात यावेळी म्हणालेत.
यावेळी त्यांनी वांद्रे येथील घटनेला केंद्राच्या संवादातील उणीवा जबाबदार असल्याचे म्हणत केंद्र सरकारवर टीका केली आहे. वांद्रा येथे रेल्वेच्या बाबतीत संवादातील उणीवा पाहायला मिळाल्या. रेल्वे सोडणार आहेत असा निर्णय झाल्याची बातमी आली आणि कालपर्यंत याची बुकिंग देखील सुरू होते. ते बुकिंग अचानक थांबवणे त्या रेल्वे रद्द करणे यात संवादाची उणीव दिसते असे सांगत वांद्र्याचा प्रसंग ओढावण्याचे कारण तेच असल्याचे म्हणत याबाबत संवाद असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः पंतप्रधान मोदींशी चर्चा करत आहेत. त्यांच्या सूचना घेत आहेत. मात्र, केंद्राकडून आम्हाला खूप मदतीची अपेक्षा आहे, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -