घरमहाराष्ट्रआगामी मुख्यमंत्री आघाडीचाच होणार; बाळासाहेब थोरातांचा दावा

आगामी मुख्यमंत्री आघाडीचाच होणार; बाळासाहेब थोरातांचा दावा

Subscribe

आगामी मुख्यमंत्री आघाडीचाच होणार, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीला चांगल्याप्रकारे यश मिळून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आघाडीचाच होणार, असा दावा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. रविवारी संगमनेर येथे प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे आदी उपस्थित होते. यावेळी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नव्या जुन्यांचा मेळ साधत नव्या जोम्याने उभे राहणार असल्याचेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

आता तरुणांना संधी – थोरात

आगामी विधानसभा निवडणुकीत तरुणांना संधी देणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर अनेक पदे रिक्त झाले आहेत. या सर्व पदांवर आता तरुणांना संधी दिली जाणार असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीत काही लोक पक्ष सोडून गेले. त्यांच्या जाण्याने पक्षाला काहीही पडला नसून त्यांच्या जागेवर तरुणांना संधी मिळणार असल्याचे थोरात म्हणाले आहेत. ‘जुने आणि नवे यांच्यात संगम साधून काम करायचे आहे. काँग्रेसवर याअगोदरही आघात झाले आहेत. मात्र, काँग्रेस नव्याने उभी राहिली आहे. दोन-तीन महिन्यात विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे आमची टीम सज्ज झाली असून सर्वसामान्य जनतेजवळ आम्ही जाणार आहोत. आज देशात भरपूर समस्या आहेत’, असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात काँग्रेसची नवी स्टाईल; थोरात प्रदेशाध्यक्ष, तर पहिल्यांदाच नेमले कार्याध्यक्ष!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -