Maharashtra Assembly Election 2024
घरताज्या घडामोडीसंगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांना धक्का ? ईव्हीएम मतमोजणीत पिछाडीवर

संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांना धक्का ? ईव्हीएम मतमोजणीत पिछाडीवर

Subscribe

नाशिक । राज्याच्या राजकारणात संगमनेर हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. येथून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून आता धक्कादायक कल समोर येत आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत.

थोरात हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. महाराष्ट्रात त्यांना काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या पंक्तित स्थान दिले जाते. याच कारणामुळे राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळालेच तर बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रिपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक मानले जात आहेत. मात्र मतमोजणीच्या पहिल्याच कलात बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर गेले आहेत.

- Advertisement -

अमोल खताळ आघाडीवर
बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने अमोल खताळ यांना तिकीट दिलेले आहे. ते महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांनी मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात बाळासाहेब थोरात यांना मागे टाकले आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अद्याप मतमोजणी बाकी, नेमके काय होणार?
समोर आलेले आकडे हे अगदीच सुरुवातीचे कल आहेत. त्यामुळे आगामी फेर्‍यांत चित्र बदलू शकते. सध्या बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर आहेत. मात्र पुढच्या काही तासांत ते आघाडी घेणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -