घरताज्या घडामोडीकाँग्रेसचे सर्व आमदार महाविकास आघाडीसोबत - बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे सर्व आमदार महाविकास आघाडीसोबत – बाळासाहेब थोरात

Subscribe

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारला मोठा फटका बसला आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट केल्यानंतर राज्य सरकार विधानसभा बरखास्तीच्या दिशेने प्रवास सुरू असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तासाभरातच आपली भूमिका मांडणार असून राजीनामा देणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान काँग्रेसचे सर्व आमदार महाविकास आघाडीसोबत असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

४४ आमदार आणि सदस्य हे मुंबईत रवाना होणार

बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी थोरात म्हणाले की, विधीमंडळ काँग्रेस अधिवेशनाची बैठक आता सुरू आहे. आम्हाला मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकिला पोहोचत आहोत. आमच्या काँग्रेस पक्षाचे ४४ आमदार आणि सदस्य हे मुंबईत रवाना होणार आहेत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

- Advertisement -

काँग्रेसचे सर्व आमदार महाविकास आघाडीसोबत

कोणत्याही प्रकारची अडचण राज्यात नाहीये. दुर्दैवाने काही प्रसारमाध्यमांतून बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे चुकीचं आहे. काँग्रेसचे सर्व आमदार महाविकास आघाडीसोबत आहेत, हे मी स्पष्टपणे सांगत आहे, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याकडे एकूण ४० आमदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या आमदारांना काल रात्रीच चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे एअर लिफ्ट करण्यात आलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे बहुमत असल्याचे म्हटले असून शिवसेनेने निवडलेला गटनेता हा घटनाबाह्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : विधानसभा बरखास्तीच्या दिशेने.., खासदार संजय राऊतांचे संकेत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -