विधानपरिषदेत मविआचे ६ उमेदवारही निवडून येतील – बाळासाहेब थोरात

राज्यसभेची निवडणूक पार पडली असून विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० जूनला निवडणूका होणार आहेत. यामध्ये काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून काहींनी आज अर्ज भरले आहेत. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या एकूण १० जागांवर ११ उमेदवार उभे राहिले आहेत. यावेळी विधानपरिषदेत मविआचे ६ उमेदवारही निवडून येतील, असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

आमचे सर्व उमेदवार जिंकून येतील

बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, हे सहा उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत. त्यामुळे हे सर्व उमेदवार विधानपरिषदेच्या निवडणुकीत कसे जिंकतील. या प्लॅनिंगसाठी आम्ही बसलो होतो. मविआचे ६ उमेदवार जिंकून आणण्यासाठी चर्चा झाली. मात्र, आमचे सर्व सहाही उमेदवार जिंकून येतील आणि आमच्यावर कोणताही दबाव टाकला जात नाहीये, असं थोरात म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर ज्या प्रकारे आरोप लावण्यात आले आहेत. तसेच ईडीने त्यांना समन्स पाठवलं असून हे सर्व चुकीचं आहे. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आमचे सर्व आंदोलक आज रस्त्यावर उतरले आहेत, असं थोरात म्हणाले.

हेही वाचा : विधानपरिषद निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार, काँग्रेस आणि भाजपात होणार लढत

ओबीसींना न्याय नक्की मिळेल

आमचे प्रयत्न महाविकास आघाडी म्हणून आहेत. त्यांच्यात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आम्ही कायद्यानुसार काम करत असून ओबीसींना न्याय नक्की मिळेल, याची खात्री आम्हाला आहे, असं थोरात म्हणाले.

आम्ही एक-एक पाऊल टाकून पुढे जाऊ

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या डेटामुळेच ते कोर्टात गेले आहेत. फडणवीसांच्या डेटामुळेच ओबीसीं मेस झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर येण्याची भाषा फडणवीसांनी करु नये. आमच्या नेते मंडळींनी आम्हाला बोलवून घेतलं होतं. महाविकास आघाडीचे सहा नेते कशापद्धतीने निवडून येतील, याबाबत एक प्राथमिक फेरी पार पडली. त्यामुळे अशा प्रकारच्या बैठका होतील. त्यानंतर आम्ही एक-एक पाऊल टाकून पुढे जाऊ, असं मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप म्हणाले.


हेही वाचा : इम्पिरिकल डेटा गोळा करताना सरकारकडून चूक, ओबीसी आरक्षणावर मोठा परिणाम होणार; फडणवीसांचा इशारा