घरताज्या घडामोडीबाळासाहेब थोरात यांचे गटनेतेपद अडचणीत?

बाळासाहेब थोरात यांचे गटनेतेपद अडचणीत?

Subscribe

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीबद्दल व्यक्त केलेली नाराजी, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दाखवलेली निष्क्रियता तसेच पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घडवून आणण्यात आलेले अपयश यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपद अडचणीत आल्याची चर्चा आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीबद्दल व्यक्त केलेली नाराजी, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दाखवलेली निष्क्रियता तसेच पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घडवून आणण्यात आलेले अपयश यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपद अडचणीत आल्याची चर्चा आहे. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाल्यानंतर थोरात यांच्याकडे विधिमंडळ पक्षाचे नेतेपद ठेवायचे किंवा कसे याबाबत निर्णय होऊ शकतो. (Balasaheb Thorat’s group leadership in trouble)

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या एबी फॉर्मवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला होता. तांबे परिवाराला राजकारणातून बाहेर काढण्यासाठी आणि बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी नाशिक पदवीधरमध्ये चुकीचे एबी फॉर्म देण्याचा आरोप तांबे यांनी केला होता. तांबे यांनी केलेले आरोप ताजे असतानाच थोरात यांनी रविवारी आपल्या वाढदिवसानिमित्त संगमनेरमध्ये आयोजित कार्यक्रमात ऑनलाईन संवाद साधताना पटोले यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले होते. माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन मधल्या काळात अत्यंत विचित्र पद्धतीचे राजकारण झाले. मला भाजपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला.

- Advertisement -

याशिवाय थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षात मला अपमानास्पद वागणूक दिली जात असून परस्पर निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोप थोरात यांनी पत्रात केल्याचे समजते. या पत्रामुळे पटोले आणि थोरात यांच्यातील वाद उघड झाला आहे. या वादाला नाशिक पदवीधरच्या निवडणुकीची किनार आहे. नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांच्याविरोधात महाविकास आघाडीने शुभांगी पाटील या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता, मात्र थोरात हे निवडणुकीच्या दरम्यान कुठेच नव्हते. शुभांगी पाटील यांच्या समर्थनार्थ त्यांनी कोणतेही निवेदन प्रसिद्ध केले नाही. नाशिक निवडणुकीत थोरात यांची भूमिका काँग्रेसला अनुकूल नव्हती. निवडणुकीत निष्क्रिय राहून त्यांनी तांबे यांना मदत केली, असे काँग्रेसमधील एका गटाचे म्हणणे आहे.

तर नाना पटोले हे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता काम करीत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांना डावलून किंवा दुखावून पक्षात निर्णय घेतले जाऊ नयेत, असे अन्य गटाचे म्हणणे आहे. थोरात आणि पटोले हे दोघेही काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे काँग्रेसश्रेष्ठी दोघांपैकी कुणा एकावर कारवाई करणार की चर्चा करून समेट घडवून आणणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

तांबे प्रकरणाची चौकशी करा – निरूपम

दरम्यान, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी तांबे प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. सत्यजित तांबे हे योग्य आहेत की अयोग्य याबाबत चौकशी होण्याची गरज आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी योग्य एबी फॉर्म पोहचला नाही यात काही षड्यंत्र आहे का, याची तपासणी होणे गरजेचे आहे, असे निरूपम यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -