घरमहाराष्ट्रउद्या बाळासाहेबांची जयंती, शिवसेनेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन; संजय राऊतांची माहिती

उद्या बाळासाहेबांची जयंती, शिवसेनेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन; संजय राऊतांची माहिती

Subscribe

Balasaheb Thackeray birth anniversary | शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी षण्मुखानंद सभागृहात सभा घेणार आहेत. या सभेमार्फत ते शिवसैनिक आणि महाराष्ट्राशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

Balasaheb Thackeray birth anniversary | मुंबई – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेच्या सर्व शाखांमार्फत उद्या ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. त्यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. तसंच, शिवसेनेत गटबाजी झालेली असली तरीही या दिवसांचं महत्त्व आणि शक्ती कमी होत नाही, असंही ते म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाची रुपरेषाच संजय राऊतांनी आज सांगितली. गेट वे ऑफ इंडिया येथे बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या पुतळ्याजवळ जाऊन बाळासाहेबांना अभिवादन करण्यात येणार आहे. यानंतर, राज्यभरातील विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. तसंच, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी षण्मुखानंद सभागृहात सभा घेणार आहेत. या सभेमार्फत ते शिवसैनिक आणि महाराष्ट्राशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

- Advertisement -

तैलचित्राच्या कार्यक्रमात हजेरी लावणार का?

विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे उद्या अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला जाणार नसल्याच्या चर्चा आहेत. याबाबत संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, हा एक राजकीय कार्यक्रम आहे. बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण असल्याने त्यावर टीका करणे योग्य नाही.

- Advertisement -

हेही वाचा – बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाला ठाकरे कुटुंबीयांना आमंत्रण; राहुल नार्वेकर

भारत जोडो यात्रा बिगर राजकीय कार्यक्रम

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही बिगर राजकीय कार्यक्रम आहे. ते देशासाठी चालत आहेत. पण काही लोकांना टीका करायचं काम आहे. त्यांनी ४५०० किमीचा प्रवास केला. या लोकांनी देशासाठी ४५० किमी चालून दाखवावं, असं आव्हानही संजय राऊतांनी केलं आहे.

पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ उद्या संपणार

उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ उद्या संपणार आहे. शिवसेना पक्षाबाबत निवडणूक आयोगाकडे सुनावणी प्रलंबित आहे. येत्या ३० जानेवारी रोजी निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. त्यामुळे पक्षप्रमुख पदाच्या उद्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचा – 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण, निमंत्रण पत्रिकेतून ठाकरेंचं नाव वगळलं

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -