पुण्याचे वैभव बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास कलाकारांच विरोध

Balgandharva Rangmandir in Pune will be demolished and this has been opposed by the artists
Balgandharva Rangmandir in Pune will be demolished and this has been opposed by the artists

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाची संकल्पना मुर्लीधर मोहोळ स्थायी समिती अध्यक्ष असताना २०१८ साली मांडली होती. यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली होती. मात्र, रंगमंदिर पाडण्यास काहींनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे पुनर्विकासासाठी महापालिका स्तरावर समिती स्थापन करण्यात आली होती. अखेर बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याला कलाकारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

२०१८ साली हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, तेव्हापासून आम्ही याला विरोध करत आहोत. राजकारणी मंडळी राजकीय स्वार्थासाठी एकत्र आले आहे. पण, आम्ही विरोध करणार आहो. आज पुणे शहरात एकूण १४ नाट्यगृह असून शहरात फक्त ३ नाट्यगृह सुरू आहेत. काही नाट्यगृह श्रेयवादावरून राजकारण सुरू असल्याने नाट्यगृह बंद आहे. असाच प्रकार या बालगंधर्व नाट्यगृह मंदिराबाबत होणार आहे आणि अजूनही यासारखी वास्तू कुठेही नाही. त्यामुळे ही वास्तू पाडू नये, असं असे मत काही कलाकार आणि सामान्य नागरिकांनी व्यक्त केले आहे.

सध्याचे बालगंधर्व रंगमंदिर साडेबावीस हजार चौरस फूट जागेवर आहे. मूळ वास्तू पाडून साडेतीन लाख चौरस फुटांचे रंगमंदिर बांधण्यात येणार आहे. नव्या वास्तूत ८०० ते ९०० दुचाकी आणि ३५० चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था असनार आहे. एक हजार, पाचशे आणि तीनशे अशा आसनक्षमतेची तीन नाट्य़गृहांचा यात समावेश असणार आहे.