पीओपीच्या मूर्तींवर बंदी कायम, पण गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणीत

गणेश मूर्तींच्या निर्मितीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

गणेशोत्सव म्हटलं की, सगळीकडेच चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण असतं. गेल्या दोन वर्षांपासून कोव्हीडच्या संकटामुळे गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा केला गेला पण या वर्षी मात्र गणेशोत्सव पुन्हा पाहिल्यासारखा उत्सहाने आणि आनंदाने साजरा केला जाणार आहे. यावर्षीचा गणेशोत्सव ३१ ऑगस्ट पासून साजरा केला केला जाणार आहे. गणेशोत्सवासाठीची तयारी ही मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. ही बातमी सुद्धा गणेशोत्सवा संदर्भातच आहे.
१ जुलै पासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. त्याच पाठोपाठ आता गणेश मूर्तींच्या निर्मितीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

 

हे ही वाचा –  संत तुकाराम महाराजांच्या पालखीला प्रारंभ, टाळ-मृदूगांच्या तालावर वैष्णवांचा भक्तीमहासागर 

प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे होणारं प्रदूषण आणि धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या मूर्ती ह्या पाण्यात पूर्णपणे विसर्जित होत नाहीत. त्यामुळे मूर्तींचे अवशेष तसेच राहतात. त्यामुळे होणार त्रास लक्षात घेता प्लास्टर ऑफ पॅरिसचा(pop) वापर करून तयार करण्यात येणाऱ्या मूर्तींवर ही बंदी या वर्षीही कायम ठेवण्यात आली. पीओपी मुळे पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. आणि पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी ही बंदी घालण्यात या वर्षीही कायम ठेवण्यात आली आहे. पण या निर्णयामुळे गणेश मूर्तिकारांमध्ये काही प्रमाणात नाराजी सुद्धा दिसते आहे. त्याचसोबत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कोणत्या प्रकारची कारवाई केली जाईल या संदर्भात अजून कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही. तर या संदर्भात निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सव आणि नवरात्र मध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घडविण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी कायम ठेवली आहे. त्याच बरोबर या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेशही महापालिकांना(bmc) दिले आहेत.

हे ही वाचा – एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका मांसाहार; अन्यथा…

 

दरम्यान दोन वर्षांनी पुन्हा एकदा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण झालं आहे. पीओपीच्या मूर्ती तयार करण्यावर बंदी असली तरीही शाडूच्या मातीच्या मूर्तीसुद्धा घडविण्यात येत आहेत. त्यामुळे पीओपीच्या मूर्तींपेक्षा शाडूच्या मातीपासून घडविलेली मूर्ती ही नेहमीच पर्यावरण पूरक सुद्धा असते.