घरमहाराष्ट्र'त्या' चारही नेत्यांची माफी मागतो,पण वाईन विक्रीचा निर्णय दुर्दैवी - बंडातात्या कराडकर

‘त्या’ चारही नेत्यांची माफी मागतो,पण वाईन विक्रीचा निर्णय दुर्दैवी – बंडातात्या कराडकर

Subscribe

राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात आत राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. अशात ह. भ. प. बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी या निर्णयावरून आता अनेक राजकीय नेत्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांनी त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध केला आहे. तर महिला आयोगानेही त्यांना नोटीस धाडली आहे. राज्यभरातून उमटणाऱ्या निषेधात्मक प्रतिक्रिया पाहता अखेर बंडातात्या कराडकरांनी जाहीर माफी मागितली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ज्या चार नेत्यांची मी नावे घेतली त्यांची माफी मागतो,पण वाईन विक्रीचा निर्णय दुर्दैवी असं बंडातात्या कराडकर म्हणाले आहेत.

“बाळासाहेबांबरोबर ज्या राजकीय लोकांची नावं घेतली त्यांच्याबद्दल माझा कोणताही पूर्व आकस नाही किंवा वैयक्तीकह द्वेष नाही. त्यात कुठला राजकीय स्टंट नाही. पण अनावधानाने बोलून गेल्याने मी त्या चारही लोकांची माफी मागतो. पोलीस त्यांच्या ड्युटीसाठी आले आहेत. पोलिसांना ज्याप्रमाणे आदेश आहेत त्याप्रमाणे मला ताब्यात घेण्यासाठी आले आहेत. राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावर आमचा जो उद्रेक झाला आहे त्यावेळी माझ्या तोंडून काही वाक्य चुकीची गेली असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे.” असं बंडातात्या कराडकर म्हणाले आहेत.

- Advertisement -

“सरकारचा वाईन विक्रीचा निर्णय दुर्दैवी आणि समाजघातकी आहे. समाजामध्ये लहान मुलं, शालेय मुलं आणि महिला त्यांच्यात वाईन पिण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे आम्हीही त्या मताशी ठाम आहोत की त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा.” असंही बंडातात्या कराडकर यांनी सांगितले आहे. टीव्ही9 या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

“सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे सदाचारी, निर्व्यसनी”

“सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंबद्दल आकसाने बोललो नाही. केवळ समाजातील ऐकिव माहितीवर ते विधान केले. अद्याप या घटेनेनंतर सुप्रिया सुळे आणि पंकडा मुंडे यांच्याशी बोलणे झाले नाही. त्यांनी भेटून दिलगिरी व्यक्त कर. दोघी नेत्यांचे वर्तन चुकीचं नसून त्या सदाचारी आहेत. तसेच निर्व्यसनी आहेत” असं म्हणत बंडातात्यांनी आपल्या आधीच्या वक्तव्यावरून युर्टन घेतला आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल मला आदरचं आहे. मी फक्त वाईन विक्रीच्या निर्णयावर व्यवहारातील म्हण म्हटली. ढवळ्याशेजारी बांधला पोवळा. केवळ धार्मिक निर्णयाच्या अनुषंगाने मी बोललो. वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून धार्मिक निर्णय लादले जातात त्याबाबत घेतलेली भूमिका चुकीची आहे. असं मला वाटतं नाही. असं बंडातात्या कराडकरांनी जाहीर केले. राजकीय नेत्यांच्या माफी मागितल्याने आध्यात्मिक आणि नैतिक वजन वाढलं आहे. माझ्या 70 वर्षाच्या जीवनात माझा कुठेच वाकडा पाय पडला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


‘त्या’ विधानाप्रकरणी बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात; महिला आयोगाने धाडली नोटीस


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -