घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमालेगावात बंदला हिंसक वळण; पोलिसांचा जमावावर लाठीचार्ज

मालेगावात बंदला हिंसक वळण; पोलिसांचा जमावावर लाठीचार्ज

Subscribe

त्रिपुरा येथे मुस्लीम समाजातील नागरिकांवर होत असलेले हल्ले, धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.१२) रजा अकादमी व इतर मुस्लीम संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, या बंदला मालेगावात हिंसक वळण लागले. बंद आवाहन करणार्‍या जमावाने दगडफेक केली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.

हल्ल्यातील दोषींवर कारवाई करावी, अल्यसंख्यांक समाजावरील होणार्‍या हल्ल्यांवर आळा घाळावा, या मागणीसाठी ऑल इंडिया सुन्नी जमेतुल उलेमा व रजा अ‍ॅकेडमीसह मुस्लीम संघटनांनी शुक्रवारी बंद पुकारला होता. मालेगावात बंद दुपारपर्यंत शांततेत पार पडत असताना दुपारनंतर हिंसक वळण लागले. अचानक काही भागातून तरूणांचे मोर्चे किदवाई रोडवरील शहीद टॉवरजवळ आले. यावेळी घोषणा देत तरूणांनी परिसर दणाणून सोडला होता. या घटनेने शहरात ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक लता दोंदे, पोलीस निरीक्षक धुसर आदी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी घटनास्थळी पाचारण झालेल्या शीघ्र कृती दलाच्या जवानांसह वाहनांवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी लोखंडी जाळ्या लावून नाकेबंदी केली असता तरूणांनी जुन्या आग्रा रोडवर व्यापारी संकुलाकडे कुच करत दगडफेक सुरू केल्याने व्यापार्‍यांनी दुकाने बंद केली होती. पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लाठीमार करत जमावास पिटाळून लावले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -