आशिष शेलारांना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक, गुन्हे शाखेची धडक कारवाई

धमकी देणाऱ्याने शेलारांना पूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती. याबाबतची तक्रार आशिष शेलार यांनी मुंबई पोलिस आयुक्त आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केली होती. वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कारवाई सुरु केली होती.

bandra crime branch unite 9 arrested accused who threat mla ashish shelar
आशिष शेलारांना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक, गुन्हे शाखेची धडक कारवाई

भाजप आमदार आशिष शेलार यांना फोन करुन धमकी देणाऱ्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांमध्येच अटक केली आहे. आशिष शेलार आणि त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत स्वतः आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून माहिती दिली होती. तसेच कारवाई करण्याची मागणी केली होती. गुन्हे शाखेने धडक कारवाई करत धमकी देणाऱ्याला अटक केले आहे. गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिट ९ च्या अधिकाऱ्यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबईतून अटक केली आहे.

भाजपचे आमदार आशिष शेलार यांना फोनवर धमकी देणाऱ्या एकाला गुन्हे शाखा वांद्रे युनिट ९ च्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. सदर आरोपी हा माहीम कॉजवे या ठिकाणी राहणार आहे. या आरोपीचे आमदार आशिष शेलारांसोबत वाद असल्याची माहिती समोर येत आहे. पूर्ववैमनस्यातून धमकी देण्यात आली होती. वांद्रे यूनिट ९ च्या अधिकाऱ्यांनी या तरुणाला अटक करुन वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आशिष शेलार यांना मागील काही दिवसांपासून दोन मोबाईल क्रमांकावरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्याने शेलारांना पूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती. याबाबतची तक्रार आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केली होती. वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कारवाई सुरु केली होती.

राज्य सरकारवर आरोप केल्यामुळे धमकी – फडणवीस

भाजप आमदार आशिष शेलार यांना मिळालेल्या धमकीवर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार आशिष शेलार राज्य सरकारच्या कारभाराविरोधात टीका करत असतात. सरकारच्या भ्रष्टाचारावर प्रश्न करत असता. तसेच सरकारमध्ये जो अनागोंदीपणा सुरु आहे. त्यावर शेलार आक्रमक भूमिका घेत असतात त्यामुळे त्यांना धमकी देण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे आणि त्याविरोधात कारवाई केली पाहिजे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.


हेही वाचा : आशिष शेलार यांच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी; पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार