पुणेरी झटका! बाणेरमध्ये विजेच्या खाबांना मशाली लावून आंदोलन

नागरिकांनीही शांत न बसता अधिकाऱ्यांना पुणेरी पॅटर्नमध्ये चांगलाच झटका दिला. दिव्यांच्या मशाली विजेच्या खांबांना लावून सुरु असलेल्या भोंगळ कारभारचा तीव्र निषेध केला.

Banerkar started torch agitation by lighting torches on electricity poles in pune baner
पुणेरी झटका! बाणेरमध्ये विजेच्या खाबांना मशाली लावून आंदोलन

शहरांप्रमाणे आज गावा खेड्यातही सर्व सुख सोयी उपलब्ध आहेत. मात्र तरिही काही गावात आजूनही अंधार आहे. पुण्यातील बाणेर हा स्मॉर्ट सिटी असलेला भाग आहे. बाणेर सुस म्हाळुंगे शिव या भागाच्या मेन रोडवरील विजेच्या खांबावरील लाईट गेली अनेक वर्षे बंद असल्याने त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. नागरिकांनी अनेकदा अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी करुनही त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. वारंवार तक्रारी करुनही दखल न घेतल्याने नागरिकही संतापले. तिथल्या नागरिकांनीही शांत न बसता अधिकाऱ्यांना पुणेरी पॅटर्नमध्ये चांगलाच झटका दिला. बाणेरच्या पदपथावरील दिवे गेली अनेक दिवस बंद होते. ते दिवे सुरु न केल्याने नागरिकांनी चक्क दिव्यांच्या मशाली विजेच्या खांबांना लावून सुरु असलेल्या भोंगळ कारभारचा तीव्र निषेध केला.

पुण्याच्या बाणेर बालेवाडी येथील स्ट्रिट लाईट्स गेल्या काही दिवसांपासून बंद पडल्या होत्या. त्या लाईट्स तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी तिथल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना केली होती. तक्रार करुनही त्याबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. बंद पडलेल्या लाईट्स बदलून स्ट्रीट लाईट्सचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी ‘मशाल आंदोलन’ करण्यात आले.

बाणेर हा स्मार्ट सिटी असलेला भाग आहे. बाणेरच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत आहे. स्ट्रीट लाईट्स बंद पडल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचबरोबर या भागात अनेक अपघात होण्यास सुरुवात झाली. आयटी सेक्टरमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी असल्याने त्यांना नाईट शिफ्टसाठी जावे लागत होते. मात्र स्ट्रीट लाईट्स नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या भागातील स्ट्रीट लाईट्स पुढील चार दिवसात सुरु करुन परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय थांबावी यासाठी विजेच्या खाबांना मशाल बांधून मशाल आंदोलन करण्यात आले.


हेही वाचा – बीडमध्ये शिवसंग्रामला मेगा गळती, १५० कार्यकर्त्यांनी बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ