सिंधुदुर्ग : बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जागतिक मानव हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर 10 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले आहे. (Bangladesh Hindu Justice Yatra to be organized in Sindhudurg on December 10)
सद्यस्थितीत बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर अन्याय होत आहे. त्या ठिकाणी त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवर देखील अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने याची दखल घ्यावी व तेथील मुंडा, चकमा, उकी, बौद्ध इत्यादी आदिवासी व दलित हिंदू बांधवांना न्याय द्यावा. यासाठी सिंधुदुर्गात सर्व हिंदू बांधवांतर्फे प्रकट निषेध करण्यासाठी व त्यांचे मूलभूत मानवाधिकाराचे संरक्षण व्हावे, संवर्धन व्हावे यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा 10 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. मूक मोर्चाच्या माध्यमातून बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात येणार आहे.
हेही वाचा – Shrikar Pardeshi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मुख्य सचिव म्हणून श्रीकर परदेशी यांची नियुक्ती
बांगलादेश हिंदू न्याय यात्रा🚩#bangladesh_hindu_nyay_yatra#blacktuesday #istandwithbangladeshhindu pic.twitter.com/oBj1O6Af8C
— Nitesh Rane (@NiteshNRane) December 6, 2024
बांगलादेशमधील हिंदूंवर धर्माच्या आधारावर होत असलेले अत्याचार थांबवावेत यासाठी जागतिक मानवाधिकार दिन 10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी ठिक 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिंधुदुर्गनगरी ओरोस ते जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे निघणाऱ्या ‘बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत’ हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून बांगलादेशी हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडूया, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले आहे.
हेही वाचा – Ajit Pawar Properties Release : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलासा; जप्त मालमत्ता झाल्या मुक्त
बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेले अत्याचार हे केवळ ते हिंदू आहेत म्हणून होत आहेत. शेकडो हिंदू मारले जात आहेत. त्यांना गोळ्या घातल्या जात आहेत. महिलांवरही अत्याचार सुरू आहेत, मुली पळविल्या जात आहेत. उघड्या डोळ्यांनी हे आपण पाहात बसायचे का? बांगलादेशात हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराने कळस गाठला आहे. तेथील अत्याचार थांबविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊयात. जागतिक मानवाधिकार दिन 10 डिसेंबर रोजी निघणाऱ्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून बांगलादेशी हिंदू बांधवांवरील अन्यायाला वाचा फोडूयात. अत्याचाराचा निषेध नोंदवूया. तेथील अत्याचार थांबले पाहिजेत याबाबत हिंदू बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भूमिका मांडूयात, असे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे.