Homeताज्या घडामोडीBangladeshi : अकोला - अमरावती बांगलादेशींसाठी भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे प्रमुख केंद्र; भाजप...

Bangladeshi : अकोला – अमरावती बांगलादेशींसाठी भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे प्रमुख केंद्र; भाजप नेत्याचा आरोप

Subscribe

मुंबई– अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसून झालेल्या हल्ल्यानंतर बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींचा शोध सुरु झाला आहे. त्यासोबतच विदर्भातील अकोला आणि अमरावती हे बांगलादेशींसाठी भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे प्रमुख केंद्र बनले असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्याच नेत्याने केला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अकोला आणि अमरावतीमध्ये फिरून घुसखारांचा शोध चालू केला. अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यात 15 हजार 845 बांगलादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र देण्यात आल्याचा गंभीर आरोप सोमय्यांनी केला आहे.

भाजप नेत्यांकडूनच आरोप 

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची आज भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. गेल्या अडीच-तीन वर्षांपासून महायुतीचे सरकार राज्यात आहे. तर केंद्रात देखील दहा वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. अशा वेळेस भाजपचेच खासदार बांगलादेशी घुसखोरांचे केंद्र महाराष्ट्रात असल्याचा दावा करत आहेत. किरटी सोमय्या हे उद्या मुंबईमध्ये बांगलादेशी रोहिंग्याच्या जन्मप्रमाणपत्र घोटाळ्यावर पत्रकार परिषद घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.

सोमय्या यांनी अकोला, अमरावती, भिवंडी, मालेगाव येथे स्वतः जावून बांगलादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांकडेही याची तक्रार त्यांनी केली आहे. अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना तहसील कार्यालयांतून बनावट जन्म दाखले दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तहसील कार्यालयाचे हे प्रताप त्यांनी नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर उघड केले आहेत. महाविकास आघाडीने विधानसभेत व्होट जिहादसाठी हे घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला. उद्या,या संदर्भात ते मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदही घेणार आहेत.

हेही वाचा : Walmik Karad : वाल्मिक कराडवर ICU मध्ये उपचार; इतर रुग्णांना दुसरीकडे पाठवले, सुरेश धस संतप्त