मुंबई : 2024 वर्षांतील निवडणुकीत घवघवीत यश मिळावं आणि महिलांना आर्थिक सक्षम करावं, या हेतूनं राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून आडीच कोटींहून अधिक महिलांना लाभ झाला. पण ही योजना ऐन निवडणुकीच्याच काळात वादाच्या भोवऱ्यात सापडली. शिवाय, या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून दिले जाणाऱ्या पैशांमुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर ताण येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. अशात या योजनेवर नवा वाद समोर आला आहे. दक्षिण मुंबईतील काही बांगलादेशी महिलांना या योजनेचा लाभ झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 5 बांग्लादेशी नागरिकांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. (bangladeshi women benefit from ladaki bahin yojana in mumbai 5 arrested from kamathipur in mumbai)
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशी महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून कामाठीपुरा परिसरात पाच बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं येथील अटकेच्या घटनेतून उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून बांगलादेशी महिलांनी खरंच या योजनेचा लाभ घेतला आहे का, किती महिलांना योजनेचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली आहे, यासंदर्भात मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे.
एकीकडे बांगलादेशी घुसकोरांवर कारवाईचा बडगा उगारला जात असून केंद्रीय स्तरावरुनही नोटीफिकेशन जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे, पोलिसांकडून बांगलादेशी नागरिकांची शोधमोहिम सुरू आहे. सध्या मुंबईत बेकायदेशीर बांगलादेशींवर कारवाई सुरू असून कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबईत 5 बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई करण्या येत असून एका एजंटलाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा लाभ खरोखरीच पात्र असलेल्या व आवश्यक असलेल्या महिलांनाच मिळाला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
या मुंबई पोलिसांच्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून केलेल्या कारवाईवर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया केली आहे. “समाजकंटक घुसखोरी करत असून इथे आल्यावर आधारकार्ड काढतात. लोकांची अपप्रवृत्ती आहेत. जी चुकीची आहे”, असे निलम गोऱ्हे यांनी म्हटले.
हेही वाचा – Thackeray vs Shinde : ठाकरे अंधेरीत तर, शिंदे बीकेसीत; बाळासाहेबांच्या जयंतीदिनी आमनेसामने