मुंबई : हल्ली बँकेचे सर्व व्यवहार ऑनलाइन झाले असले तरी अनेक जण ऑफलाइन व्यवहारही करतात. त्यामुळे ऑफलाइन बँकेचे व्यवहार करणाऱ्यांनी आजच त्यांचे सर्व व्यवहार किंवा बँकेतील कोणतेही काम आटोपून घ्यावे. कारण नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने बँका पाच दिवस बंद राहणार आहेत. परंतु, वेगवेगळ्या राज्याप्रमाणे या सुट्या आहेत. तर महाराष्ट्रात 25 डिसेंबरला नाताळ निमित्ताने, 28 डिसेंबरला चौथा शनिवार असल्याने आणि 29 डिसेंबरला रविवार असल्याने बँकांना सुटी असणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील नागरिकांना बँकांची कामे गुरुवारी आणि शुक्रवारी करता येणार आहे. (Bank holidays are announced on the occasion of Christmas and New Year)
भारतातील अनेक राज्यांमध्ये नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या सुट्या आल्या असून काही राज्यांमध्ये नवीन वर्षाच्या आधी तब्बल आठ दिवस सुट्या आहेत. तर काही राज्यांमध्ये सलग पाच दिवस सुट्या आहेत. त्यामुळे आता वेगवेगळ्या राज्यानुसार आरबीआयकडून सुट्यांची लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. परंतु, महाराष्ट्रात नववर्षाच्या आधीच केवळ तीनच दिवस सुट्या असल्याने राज्यातील लोकांना याबाबत फार चिंता करण्याची गरज नाही.
हेही वाचा… Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता, डिसेंबरचा हप्ता नववर्षाआधीच मिळणार
या तारखांना बँका बंद…
- मंगळवार, 24 डिसेंबर : ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला कोहिमा, आयझॉलमध्ये बँका बंद राहतील.
- बुधवार, 25 डिसेंबर : नाताळच्या राष्ट्रीय सुट्टीमुळे सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.
- गुरुवार, 26 डिसेंबर : नाताळनिमित्त काही राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.
- शुक्रवार, 27 डिसेंबर : नाताळनिमित्त काही राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.
- शनिवार, 28 डिसेंबर : चौथा शनिवार
- रविवार, 29 डिसेंबर : साप्ताहिक सुटी
- सोमवार, 30 डिसेंबर : शिलाँगमध्ये यू कियांग नांगबहामुळे बँका बंद राहतील.
- मंगळवार, 31 डिसेंबर : नवीन वर्षाची पूर्वसंध्या (काही राज्यांमध्ये स्थानिक सुट्टीमुळे बँका बंद राहतील)
हेही वाचा… MHADA Lottery 2024 : म्हाडाकडून मुंबईकरांना आणखी एक संधी, कोकण मंडळातर्फे अर्ज करण्यास मुदतवाढ