पुढील महिन्यात बँका राहणार १२ दिवस बंद; ग्राहकांनो लवकर उरका आपली कामे

मार्च महिन्याची सुरुवात होळीच्या सणाने होत आहे. यानिमित्ताने देशातील बऱ्याच भागात बँकांना सुट्टी असणार आहे.

bank holidays in august

मार्च महिन्याची सुरुवात होळीच्या सणाने होत आहे. यानिमित्ताने देशातील बऱ्याच भागात बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या महिन्यात बँकेसंबंधित काही महत्त्वाची काम करायची असेल तर बँकांच्या सुट्ट्याची संपूर्ण यादी पाहूनच घराच्या बाहेर पडायला पाहिजे. (bank holidays in march 2023 holi shree ram navami gudi padwa)

चालू आर्थिक वर्षाचा मार्च शेवटचा महिना आहे. हा महिना अनेक बाबतीत खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात रविवार आणि दुसऱ्या आणि चौथा शनिवार मिळून वेगवेगळ्या झोनमध्ये बँकांना एकूण 12 दिवसांची सुट्टी असणार आहे. बँकांच्या सुट्ट्यांची पूर्ण यादी आरबीआयने जाहीर केली आहे.

बँक सुट्ट्यांची यादी आरबीआयने जारी केली असून, त्यानुसार, मार्चमधील चार रविवार आणि दोन शनिवारच्या सुट्ट्याही यादीत दाखवल्या आहेत.

या दिवशी बँका उघडणार नाहीत

 • 3 मार्च 2023- छपचार कूटनिमित्त आयझॉलमध्ये बँका बंद राहतील.
 • 5 मार्च 2023 – रविवारची सुट्टी
 • 7 मार्च 2023- बेलापूर, गुवाहाटी, कानपूर, लखनौ, हैदराबाद, जयपूर, मुंबई, नागपूर, राची आणि पणजी येथे धुलेती / डोल जत्रा / होळी / यासंगाच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
 • 8 मार्च 2023 – आगरतळा, अहमदाबाद, ऐझॉल, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, इम्फाळ, कानपूर, लखनौ, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगर येथे बँका बंद राहतील.
 • 9 मार्च, 2023 – होळीच्या निमित्ताने फक्त पाटण्यात बँकेला सुट्टी असेल.
 • 11 मार्च 2023 – दुसरा शनिवार सुट्टी
 • 12 मार्च 2023 – रविवारची सुट्टी
 • 19 मार्च 2023 – रविवारची सुट्टी
 • 22 मार्च 2023 – बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, आंध्र प्रदेश, तेलंगणा, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा आणि श्रीनगर येथे गुढीपाडवा / उगादी / बिहार दिन / साजिबू नोंगमापनबा / प्रथम नवरात्रीनिमित्त बँक बंद / तेलुगु नवीन वर्षाचा दिवस राहील
 • 25 मार्च 2023 – चौथा शनिवार सुट्टी
 • 26 मार्च 2023 – रविवारची सुट्टी
 • 30 मार्च 2023 – अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा, रांची येथे रामनवमीनिमित्त बँका बंद राहतील.

हेही वाचा – दिलासादायक! ठाकरे गटाचे 15 आमदार अपात्र ठरणार नाहीत; व्हिपबद्दल न्यायालयात शिवसेनेचे आश्वासन