विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी ‘या’ दोन दिवशी जाणार संपावर

आपल्या विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संपावर जाणार आहे. बँक कर्मचाऱ्यांची संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (UFBU) बैठकीत संपावर (Strike) जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्री अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प-2023 (Union Budget 2023) सादर करणार आहे.

three days bank remain closed due to strike

आपल्या विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संपावर जाणार आहे. बँक कर्मचाऱ्यांची संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (UFBU) बैठकीत संपावर (Strike) जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्री अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प-2023 (Union Budget 2023) सादर करणार आहे. मात्र, अर्थसंकल्प सादर करण्याच्या दोन दिवस आधीच म्हणजेच 30 व 31 जानेवारी रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार आहे. बँक कर्मचारी दोन दिवसाच्या संपावर जाणार असल्याने सामान्य ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. (bank staff to strike on 30th and 31st January for various demand)

बँक कर्मचाऱ्यांनी (Bank Strike) 30 आणि 31 जानेवारी रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स ही विविध बँक कर्मचार्‍यांच्या संघटना एकत्र करून स्थापन केलेली संघटना आहे. बँक संघटनांनी आपल्या मागण्यांबाबत सरकारवर दबाव आणण्यासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

  • बँक कर्मचारी युनियनने बँकिंग कामकाज पाच दिवसांचे करावे.
  • राष्ट्रीय पेन्शन योजना संपुष्टात आणावी
  • पगार वाढीबाबतच्या वाटाघाटी सुरू कराव्यात
  • बँकांमधील सर्व कॅडरमध्ये भरती प्रक्रिया लागू करावी
  • यांसह आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, “युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सची बैठक झाली आहे. आमच्या मागण्यांबाबत पत्र लिहूनही इंडियन बँक असोसिएशनकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यानंतर बँक संघटनांनी दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे”, असे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी सांगितले

बॅक कर्मचाऱ्यांनी जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातील पहिल्या दोन दिवशी संपाची हाक दिली आहे. बँक कर्मचारी संघटनांनी सोमवारी 30 जानेवारी आणि मंगळवारी 31 जानेवारी रोजी संप पुकारला आहे. विशेष म्हणजे जानेवारी महिन्याचे शेवटच्या दिवशी संप पुकारण्यात आला आहे. या दिवसांमध्ये पगार, पेन्शन जमा केले जातात. संपामुळे याला उशीर होण्याची शक्यता आहे.

चार दिवस बँका राहणार बंद

बॅक कर्मचाऱ्यांनी जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातील पहिल्या दोन दिवशी संपाची हाक दिली आहे. म्हणजेच 30 आणि 31 जानेवारी रोजी संप पुकारण्यात आला आहे. मात्र, त्यापूर्वी महिन्याचा चौथा आठवडा असल्याने बँकांना शनिवार आणि रविवार सुट्टी असते. त्यामुळे 28 व 29 जानेवारीलाही बँका बंद असतील. परिणामी संपाचे दोन दिवस आणि विकेंडचे दोन दिवस असे मिळून एकूण चार दिवस बँका बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – मुंबईकर गारठले! गेल्या चार दिवसांत पारा 16 अंशावर; राज्यातही गुलाबी थंडी