घरमहाराष्ट्रपुणेHarshvardhan Patil : 'बारामती मतदारसंघ राष्ट्रवादीला दिलेला नाही'; हर्षवर्धन पाटलांचे सूचक वक्तव्य

Harshvardhan Patil : ‘बारामती मतदारसंघ राष्ट्रवादीला दिलेला नाही’; हर्षवर्धन पाटलांचे सूचक वक्तव्य

Subscribe

पुणे : अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यापासून भाजपाच्या नेत्यांनी उघडपणे त्याला विरोध दर्शविला नसला तरी अनेक जण नाराज असल्याचे पाहायला मिळाले. काही वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील यांनी 2019 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. ज्यानंतर त्यांनी एका भाषणात भाजपामध्ये गेल्यापासून आता शांत झोप लागते, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. आता त्यांनी सूचक वक्तव्य करून अजित पवारांना डिवचण्याचे काम केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना हर्षवर्धन पाटील यांनी प्रश्नांची उत्तरे दिली. परंतु, यावेळी त्यांनी अजित पवार महायुतीत आले असले तरी इंदापूर विधानसभेची कोणी चिंता करू नये, असा टोला लगावला आहे. (‘Baramati constituency not given to NCP’; Indicative statement by Harshvardhan Patil)

हेही वाचा… NCP : कोणत्या गटाकडे किती संख्याबळ! दोन्ही बाजूने सह्या केलेले पाच आमदार कोण?

- Advertisement -

तुम्ही भाजपामध्ये आल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागत होती, पण अजित पवार महायुतीत आल्यानंतर तशीच शांत झोप लागतेय का? असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की, माझ्या मनात कोणतीही अशांतता निर्माण झालेली नाही. तसेच बारामती लोकसभेत महायुतीचा उमेदवार घड्याळाचा चिन्हावर उतरेल, हे महायुतीत अद्याप ठरले नाही, असे वक्तव्य पाटलांनी केल्याने खळबळ उडाली आहे. ज्यामुळे आता बारामती लोकसभा नेमकी कोण लढवणार? महायुतीत याबाबत नेमका कोणता निर्णय घेण्यात येणार? अजित पवार महायुतीसाठी बारामतीवरील दावा सोडणार का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.

यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाबाबत म्हटले की, अजित पवार महायुतीत आले असले तरीही इंदापूर विधानसभा मतदारसंघाची चिंता कुणीही करू नये, त्यामुळे या काही जागांमुळे महायुतीत वाद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. त्यामुळे आता महायुतीमध्ये या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) दावा केला जाण्याची शक्यता आहे. दत्ता भरणे हे अजित पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यामुळे इंदापूरच्या जागेवरून भाजप आणि अजित पवार गटामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

तर, दुसरीकडे बारामती मतदारसंघातून हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटलांनीही तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी हा मतदारसंघ कुणाला मिळणार यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगितले असल्याचे बोलले जात आहे. ज्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी असे वक्तव्य करून अजित पवारांना डिवचण्याचे काम केले आहे, असे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -