घरताज्या घडामोडीBaramati : कितीबी समोर येऊ दे..., शरद पवारांचे फोटो स्टेटसला ठेवत सुप्रिया...

Baramati : कितीबी समोर येऊ दे…, शरद पवारांचे फोटो स्टेटसला ठेवत सुप्रिया सुळेंचा विरोधकांना इशारा

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जागावाटप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या मतदारसंघात पवार कुटुंबातच लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे.

बारामती : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जागावाटप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या मतदारसंघात पवार कुटुंबातच लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे नणंद विरुद्ध भावजय अशी बारामतीत लढत असून, मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशातच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसच्या माध्यमातून विरोधकांना डिवचल आहे. (Baramati lok sabha election MP Supriya Sule has warned the opponents by posting a status of Sharad Pawar)

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसच्या माध्यमातून विरोधकांना डिवचल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांचा फोटो त्यांनी आपल्या स्टेटसला ठेवला आणि कितीबी येऊ देत, आमचा बॉस एकटा पुरेसा असल्याचा त्यांनी यात लिहिले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर शरद पवारांचे दोन फोटो वापरलेत. एका फोटोत पवारांनी हात वर केलेला आहे तर दुसऱ्या फोटोत ते कॉलर उडवताना दिसताय आहेत.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा त्यांना राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण असे विचारले होते. त्यावेळी पवारांनी क्षणाचाही विचार न करता हात वर करत मी स्वतः असं सांगितलं होतं. तेव्हा हा फोटो प्रचंड गाजला होता. तर दुसरा फोटो हा साताऱ्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांना उदयनराजे यांच्या विरोधात संभाव्य उमेदवार कोण असेल असे विचारले होते. त्यावेळी शरद पवारांनी कॉलर उडवत उत्तर दिले होते. या दोन्ही फोटोची तेव्हा खूप चर्चा झाली होती.

- Advertisement -

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. तर त्यांच्या विरोधात पवार कुटुंबातीलच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे पवार विरुद्ध पवार असा सामना बारामतीत पाहायला मिळणार आहे. आता यावर विरोधकांकडून काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा – LOK SABHA 2024 : गडचिरोलीत काँग्रेसचे उमेदवार किरसान यांचा विजय होणार – विजय वडेट्टीवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -