घरमहाराष्ट्रपुणेBaramati Lok Sabha Elections : अजित पवारांच्या घोषणेनंतर शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट,...

Baramati Lok Sabha Elections : अजित पवारांच्या घोषणेनंतर शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट, म्हणाले…

Subscribe

पुणे : कर्जत येथील मंथन शिबिरात अजित पवार गटाने घोषणा केली आहे की, बारामती, सातारा, शिरुर आणि रायगड चार जागा लढवणारच. याचपार्श्वभूमीवर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, जयंत पाटील ठरवतील तो उमेदवार बारामतीतून निवडणूक लढवणार आहे. (Baramati Lok Sabha Elections Ajit Pawar announcement Sharad Pawar position is clear Jayant Patil)

हेही वाचा – Sharad vs Patel : प्रफुल्ल पटेल यांनी ईडीवर पुस्तक लिहावं; शरद पवारांचा पटेलांना टोला

- Advertisement -

शरद पवार म्हणाले की, संसदीय लोकशाहीत कोणताही पक्ष आपला कार्यक्रम घेऊन एखाद्या मतदारसंघात निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे बारामती मतदारसंघ असेल किंवा अन्य मतदारसंघातही इतर पक्षांना, इतर घटकांना आपला विचार जनतेसमोर मांडण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक लढवली, तर तक्रार करण्याचं कारण नाही. शेवटी लोकांसमोर जाऊन भूमिका मांडायची असते आणि त्याबद्दल लोक जो निर्णय घेतील, तो स्वीकारायचा असतो, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच बारामीत लोकसभा निवडणुकीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, आमचा बारामतीचा उमेदवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठरवतील. ते जो उमेदवार ठरवतील तो व्यक्ती बारामतीमधून खासदारकीची निवडणूक लढविणार आहे.

अजित पवार काय म्हणाले?

कर्जत येथील मंथन शिबिरात बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विचारांचे जास्तीत जास्त खासदार निवडून येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. यासाठी बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा या चार मतदारसंघात आपण निवडणूक लढवणारच आहोत. पण त्याशिवाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिथं खासदार आहेत, त्यातील काही जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, असं अजित पवार म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar : त्यांच्या धरसोडवृत्तीमुळे ‘तो’ निर्णय घेतला; अजितदादांच्या गौप्यस्फोटावर शरद पवार म्हणतात…

बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना रंगणार? 

अजित पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या बारामतीत अजित पवार यांची चुलत बहीण सुप्रिया सुळे खासदार आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार कोणाला मैदानात उतरवणार याची महाराष्ट्रालाही उत्सूकता आहे. अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभा लढणार का? हे अजून स्पष्ट झालेले नाही. याशिवाय अजित पवार मुलगा पार्थ पवारला बारामतीच्या लोकसभेत उतरवण्याचीही शक्यता आहे. मात्र सुप्रिया सुळे यांच्याविरोधातील लढाई ही सोपी असणार नाही, याची जाणीव अजित पवारांनाही आहे. त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांना अजित पवार उमेदवारी देण्याची शक्यता जास्त आहे. दत्तात्रय भरणे यांच्या नावाला भाजपाकडूनही ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांचाही विधानसभेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. दत्तात्रय भरणे हे धनगर समाजाचे आहेत. बारामती मतदारसंघातील धनगर समाजाची निर्णायक मते ही भरणेंच्या पथ्यावर पडण्याची शक्यता अधिक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -