घर महाराष्ट्र 'आता शांततेत मोर्चा नाही...,'; बारामतीत मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला इशारा

‘आता शांततेत मोर्चा नाही…,’; बारामतीत मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला इशारा

Subscribe

झेंडा कोणत्याही पक्षाचा असो, मात्र त्यांचा दांडा हा मराठा समाजाचा आहे, जो आरक्षण देईल, त्याच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा राहील, असा निर्धार आज मराठा मोर्चातील आंदोलकांनी केला. तसंच, आता यापुढे शांततेत मोर्चा निघणार नाही, असं म्हणत त्यांनी थेट सरकारला इशाराचा दिला आहे

बारामती: जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलीस लाठीमारानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. बारामतीतही सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं बारामती बंदची हाक देण्यात आली होती. सकाळी कसब्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून मोर्चा निघाला व भिगवण चौकात त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वक्त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. झेंडा कोणत्याही पक्षाचा असो, मात्र त्यांचा दांडा हा मराठा समाजाचा आहे, जो आरक्षण देईल, त्याच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा राहील, असा निर्धार आज मराठा मोर्चातील आंदोलकांनी केला. तसंच, आता यापुढे शांततेत मोर्चा निघणार नाही, असं म्हणत त्यांनी थेट सरकारला इशाराचा दिला आहे. (Baramati Maratha said they will support those who will support maratha community )

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात 558 मूक मोर्चे अत्यंत शांततेने मराठा बांधवांनी काढले, पण त्याचा काहीही उपयोग न झाल्यानं आता सगळे प्रोटोकॉल बाजूल ठेवून मराठा समाजाचे मोर्चे निघतील, त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशाराही दिला गेला. यापुढील काळातील मोर्चे हे मंत्रालयावर काढण्याची तयारी करण्याचेही सूतोवाच केले गेले. या पुढील मोर्चा हा मूक मोर्चा नसेल तर तो मोठा मोर्चा असेल असंही जाहीर केलं गेलं.

- Advertisement -

मराठा समाजाच्या महिलांना मारहाण झाली, ही बाब संतापजनक असून अशा घटना घडल्यास मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा दिला गेला. मराठा क्रांती मोर्चामध्ये दुफळी माजवण्याचा काही जणांचा राजकीय डाव असला तरी मराठा समाज एकसंघच असेल, असा निर्धार यावेळी करण्यात आला. तसंच, मराठा समाजाला राजकीय आरक्षणापेक्षाही शैक्षणिक व सामाजिक आरक्षण जास्त महत्त्वाचं वाटतं, हे आरक्षण मिळवण्यासाठी समाज एकसंध असेल, असंही वक्तव्यांनी नमूद केलं.

या मोर्चादरम्यान अनके आंदोलकांनी अजित पवार यांनी आरक्षण मिळत नसेल तर सत्तेतून बाहेप पडावे, अशी तीव्र भूमिका घोषणाच्या माध्यमातून व्यक्त केली. आरक्षणाच्या मुद्यावर सर्वच नेतेमंडळींनी मोर्चात सहभागी व्हायला हवं होतं, या मागणीला पाठिंबा द्यायला हवा होता., अशी भावनाही व्यक्त केली गेली. अनेक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आरक्षणाच्या मागणीसाठी दिरंगाई होत असल्याबद्दल सरकारचा निषेध केला. आरक्षण द्यायला जमत नसेल तर सत्तेतून पायउतार व्हा, असंही सांगितलं.

- Advertisement -

तसंच, मराठ्या समाजच्यावतीने मागितले जाणारे आरक्षण कोणावरही अन्याय करणारे नसून त्यांच्या न्याय हक्काचे आहे, कोणाचेही आरक्षण डावलून आम्ही आरक्षण मागत नाही तर आम्ही आमच्या हक्काचेच आरक्षण मागत असल्याचं या वेळी कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.

(हेही वाचा: जालन्यातील घटना चुकीचीच; लाठीमाराचे समर्थन करणार नाही – देवेंद्र फडणवीस )

- Advertisment -