बारामतीत ४६ लाखांचा गांजा जप्त; चार अरोपींना अटक

पुणे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई

बारामती तालुका पोलिसांनी सोमवारी रात्री केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो मुद्देमालासह ताब्यात घेतला. यामध्ये जवळपास ३१२ किलो गांजा जप्त केला असल्याची माहिती मिळतेय. मुसळधार पावसात बारामती पोलिसांनी पाटस-बारामती मार्गावर टॅम्पो (एमएच.१०. सीआर. ४३२६) पकडून ही मोठी कारवाई केली आहे. यातील चार अरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यात विक्री करण्यासाठी विशाखापट्टणम येथून , ३१२ किलो गांजा येणार होता. तसेच आंध्रप्रदेशातून आणलेला गांजा या मार्गे जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी नाकाबंदी केली होती. मात्र, इशारा करुन देखील टेम्पो निघून गेला. यावेळी पोलिसांनी सरकारी वाहनासह खासगी कारमधून टेम्पोचा चित्रपटात शोभेल असा पाठलाग करुन टेम्पो अडवला आणि गांजा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आसल्याचे सांगितले जात आहे. विजय जालिंदर कणसे (वय २६, रा. कानरवाडी, ता. कडेगांव जि. सांगली), विशाल मनोहर राठोड (वय १९ रा. नागेवाडी, विटा, ता, खानापूर जि. सांगली), निलेश तानाजी चव्हाण (वय ३२, रा. आंधळी, ता. माण, जि. सातारा) व योगेश शिवाजी भगत (वय २२, रा. साबळेवाडी, शिर्सूफळ, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय


दिल्लीत गोंधळ; राज्यसभेतल्या राड्याने व्यथित होऊन उपसभापतीच उपोषणावर!