Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रSupriya Sule : मेळाव्याचे अद्याप आमंत्रणच नाही; मिळाले तर नक्की जाणार - सुप्रिया सुळे

Supriya Sule : मेळाव्याचे अद्याप आमंत्रणच नाही; मिळाले तर नक्की जाणार – सुप्रिया सुळे

Subscribe

पुणे : रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी बारामतीच्या दौऱ्यावरती आहे परंतु या कार्यक्रमाचे आमंत्रणच मिळाले नसल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी बारामती दौऱ्यावर आहे परंतु या कार्यक्रमाचे आमंत्रणच मिळाले नसल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तर शरद पवारांनी या कार्यक्रमासाठी वेळ राखून ठेवला असल्याची प्राथमिक माहिती आहे. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. अद्याप आमंत्रण नाही पण बोलवलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करायला जाणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

‘या रोजगार मेळाव्याचं आमंत्रण मला अजून आलेलं नाही. मात्र या कार्यक्रमाला बोलवलं तर मी नक्की जाणार आणि राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार आहे. या परिसराची मी लोकप्रतिनिधी असल्याने ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

हेही वाचा – Nilesh Rane : थकबाकी 25 लाखांची, बजावले 3 कोटी; पालिका म्हणते चुकून झाले

पुणे विभागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बारामती येथे 2 आणि 3 मार्च रोजी आयोजित विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’च्या पार्श्वभूमीवर शुक्रवार 1 मार्च रोजी नोकरी विषयक कौशल्ये (सॉफ्ट स्किल्स), मुलाखत तंत्र या विषयांवर मेळावापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. रोजगार मिळविण्यासाठी मुलाखतीला जाताना युवक-युवतींना प्रशिक्षणाचा लाभ होणार असून रोजगार इच्छुक युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

नमो रोजगार मेळाव्यासाठी राज्यातील महत्त्वाचे तीन नेते बारामतीमध्ये येणार आहेत. या रोजगार मेळाव्यासोबतच पोलीस उपमुख्यालय, बस स्थानक, पोलीस वसाहतीचे उद्घाटन होणार आहे. आजपर्यंत बारामतीत अजित पवार इमारती बांधायचे आणि उद्घाटन शरद पवार करायचे, अशी प्रथा होती. पण आता अजित पवार सत्तेत गेले आणि अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाच बोलावणं धाडलं आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बारामतीत येणार असल्याने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा – Sandeshkhali case : आरोपी शाहजहान शेखला 10 दिवसांची कोठडी, तृणमूलमधून 6 वर्षांसाठी निलंबित

जिथे कार्यक्रम, ती इमारत शरद पवारांनीच बांधलेली

बारामतीत नमो रोजगार मेळावा होतोय. हा रोजगार मेळावा विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या मैदानात पार पाडतो आहे. ज्या संस्थेच्या आवारात हा कार्यक्रम पार पाडतो आहे ही इमारत 50 वर्षपूर्वी शरद पवारांनी बांधली आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे.