घरमहाराष्ट्रपुणेSUPRIYA SULE : "...जे घडले ते काही योग्य नाही", असे का म्हणाल्या...

SUPRIYA SULE : “…जे घडले ते काही योग्य नाही”, असे का म्हणाल्या सुप्रिया सुळे

Subscribe

बारामती : राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यावर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यापूर्वीच बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात एक घटना घडली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना विजयी करा, असा बॅनर लागला होता. या बॅनरवर शाईफेक करण्यात आली. बारामतीच्याच खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ”हे जे घडलं ते योग्य नाही, हे कोणी केले आहे, याची चौकशी झाली पाहिजे. जे केलंय ते चुकीचं आहे. कुणाचाही बॅनर लावला असेल त्याच्यावर शाई फेकणं हे अत्यंत चुकीचं आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळे या रविवारी बारामती दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांची संवाद साधल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विविध मुद्द्यावर त्या बोलत होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – Vinod Ghosalkar : आमचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र; विनोद घोसाळकरांचा आरोप

नेमकं प्रकरण काय?

बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना विजयी करा, अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला होता. त्यांच्या या फ्लेक्सवर शाई फेकण्यात आल्याचे रविवारी समोर आले. या घटनेनं खळबळ उडाली. तसेच तातडीने बॅनर काढण्यात आला. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतच सुप्रिया सुळे यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान भाष्य केलं. या घटनेची बारामतीसोबतच राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

- Advertisement -

पवार – सुळे आमनेसामने?

आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहण्याची शक्यता आहे. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी मनमोकळेपणाने भाष्य केलं. देशात लोकशाही आहे. लोकशाहीत विरोधक असला पाहिजे मात्र तो दिलदार असला पाहिजे.लोकांना दम देणं ह्या गोष्टी महाराष्ट्रात शोभत नाहीत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा – Sharad Pawar Funda : पक्षाचे नाव ठरविताना 25 वर्षांपूर्वीचीच चाल; राष्ट्रवादीवर पवारांचीच छाप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -